साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी - मिलिंद बोकील
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 09:09 PM2017-09-30T21:09:23+5:302017-09-30T21:09:34+5:30
साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशी टीका सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी केली. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते.
ठाणे - साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशी टीका सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी केली. मॅजेस्टिक गप्पा या कार्यक्रमात ते बोलत होते. खरं तरं संमेलन हा शब्दही मी उच्चारत नाही. संमेलन हा साहित्य व्यवहाराचा भाग आहे. त्यामुळे जनतेला या व्यवहारात सामील करून घेतले पाहिजे. मात्र तसे होत नाही. संमेलन दुष्ट बुद्धीच्या पुरूषांनी निर्मित केलेलं आहे. साहित्य संमेलनातून जातीयवाद, कंपुशाही आणि साटेलोट्याचे दर्शन घडतं. साहित्य संमेलन म्हणजे चोरांची आळंदी आहे, अशा शब्दांत सुप्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांनी टीका केली आहे.
मॅजेस्टिक बुक डेपो आयोजित आणि हितवर्धिनी सभेचे स्वा.सावरकर वाचनालय,ठाणे यांच्या सहकार्याने मॅजेस्टिक गप्पा हा कार्यक्रम स्वा.सावरकर वाचनालय येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोकील यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते असेही म्हणाले की, मी साहित्य संमेलनांमध्ये कधीच जात नाही. एवढेच नाही तर कोणतेही खरे लेक तिथे दिसणार नाहीत. या संमेलनांमध्ये जनतेचा सहभाग नसतो. केवळ आपल्याला मेंढरासारखं बोलावून जे उत्सव साजरे होतात. त्या संमेलनांवर वाचक जनता बहिष्कार का घालत नाही? याच्याविरोधात वाचक निर्णायक पाऊल उचलत नाहीत. इतके ते बुद्धु कसे? अशा शब्दात बोकील यांनी वाचकांचा समाचार घेतला.