‘लोकमत’चे माने यांना पत्रकार संघाचा पुरस्कार, शनिवारी वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:14 AM2018-01-02T06:14:06+5:302018-01-02T06:14:21+5:30

कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाचे २०१७ चे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्रीकांत टोळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे प्रशांत माने यांना, तर रत्नाकर चासकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार विशाल वैद्य यांना जाहीर झाला आहे.

 'Lokmat' mane gets a journalist award, distribution on Saturday | ‘लोकमत’चे माने यांना पत्रकार संघाचा पुरस्कार, शनिवारी वितरण

‘लोकमत’चे माने यांना पत्रकार संघाचा पुरस्कार, शनिवारी वितरण

Next

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाचे २०१७ चे पत्रकार पुरस्कार जाहीर झाले आहेत. श्रीकांत टोळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार ‘लोकमत’चे प्रशांत माने यांना, तर रत्नाकर चासकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार विशाल वैद्य यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार स्वप्नील शेजवळ यांना जाहीर झाला आहे.
पूर्वेतील बालभवन येथे शनिवार, ६ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान होणाºया पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील. या कार्यक्र मास राज्यमंत्री व स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, महापौर राजेंद्र देवळेकर, ‘लोकमत’चे सहायक संपादक संदीप प्रधान, राजेंद्र हुंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत व डोंबिवली विभागीय अध्यक्ष अनिकेत घमंडी यांनी दिली.
पत्रकारिता करताना विविध संकटांवर मात करून पुन्हा त्याच जिद्दीने, उमेदीने पत्रकारितेत दमदार पुनरागमन करणाºया पत्रकारांना झुंजार पत्रकार पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी केतन बेटावदकर यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्र मात कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कांबळे आणि पत्रकार रवींद्र घोडविंदे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कार स्पर्धेचे परीक्षक म्हणून तुषार राजे आणि मनोज पांडे यांनी काम पाहिले.

डॉ. पाटे यांचाही गौरव

यंदाच्या वर्षापासून पत्रकार संघासाठी अमूल्य अशी मदत करणाºया व्यक्ती किंवा संस्थेला पत्रकारमित्र हा नवीन पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, यंदाचा पत्रकारमित्र पुरस्कार इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. मंगेश पाटे यांना जाहीर झाला आहे.

Web Title:  'Lokmat' mane gets a journalist award, distribution on Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.