तडीपार गुंड महेश कामतला पुन्हा खंडणी प्रकरणात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 04:33 PM2018-05-02T16:33:04+5:302018-05-02T16:33:04+5:30
बदलापूरातील स्थानिक दैनिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम पाहणा-या महेश कामत याला खंडणीच्या प्रकरणामुळे गेल्या 15 दिवसांपूर्वीच तडिपारीची कारवाई करण्यात आली होती. तडिपार असतांना देखील तो पुन्हा आपल्या घरात बसुन खंडणू वसुल करित होता.
बदलापूर - बदलापूरातील स्थानिक दैनिकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम पाहणा-या महेश कामत याला खंडणीच्या प्रकरणामुळे गेल्या 15 दिवसांपूर्वीच तडिपारीची कारवाई करण्यात आली होती. तडिपार असतांना देखील तो पुन्हा आपल्या घरात बसुन खंडणू वसुल करित होता. अशाच एका प्रकरणात बदलापूर पोलीसांनी खंडणी प्रकरणात यशस्वी सापळा चरुन कामत आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पत्रकारीतेचे नाव पुढे करुन कामत हा अनेकांकडुन खंडणू वसुलत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
बदलापूरातील एका स्थानिक दैनिकाचा कार्यकारी संपादक म्हणून महेश जगन्नाथ कामत हा काम पाहत आहे. कामत याच्यावर या आधी देखील खंडणीचे आणि अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची गुन्हेगारी पाश्वभूमी पाहाता पोलीसांनी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली होती. तडीपारीची कारवाई सुरु असतांना त्याने या प्रकरणात कोकण आयुक्तांकडुन स्थगिती आदेश आणले होते. मात्र पोलीसांनी त्याची गुन्हेगारी पाश्वभूमी आणि शहराला असलेला धोका लक्षात घेऊन कोकण आयुक्तांकडे बाजू भक्कमपणो मांडली. अखेर कामत याची खंडणीखोरीचे प्रकार पाहता कोकण आयुक्तांनी त्याच्या तडिपारीच्या आदेशाला मंजुरी दिली. हे आदेश येताच पोलीसांनी 15 दिवसांपूर्वीच त्याला मुंबई आणि ठाणो हद्दीतुन तडीपार केले होते. त्यामुळे कामत हा कर्जत तालुक्यातील भीवपूरी परिसरात असल्याची चर्चा होती. कामत हा हद्दपार असतांना देखील बदलापूरात खंडणी वसुलीची कामे करितच होता. असाच एक प्रकार पुढे आला अहो. बदलापूरातील संदिप देशमुख हा आपल्या एका मैत्रिणीसोबत व्हॉटस्अॅपवर बोलत होता. त्यांच्यातील वाद हे त्या मैत्रिणीने आपल्या फेसबुक पेजवर लोड केले. त्याचे स्क्रिन शॉट महेश कामत याने डाऊनलोड करुन ते सर्व फोटो संदिप देशमुख याला पाठविले. तसेच त्यालाल वर्तमान पत्रत बातमी छापतो अशी धमकी दिली. हे प्रकरण दडविण्यासाठी त्याने देशमुख यांच्याकडुन 1 लाखांची खंडणी मागितली. घाबरलेल्या देशमुख यांनी त्या खंडणीच्या रक्कमेपैकी 40 हजार रुपये कामत याने पाठविलेल्या व्यक्तीकडे दिले देखील. उर्वरित 6क् हजार रुपयांसाठी कामत पुन्हा देशमुख यांना त्रस देत होता. कामत याचा त्रस असाह्य झाल्यावर देशमुख याने या प्रकरणाची तक्रार बदलापूर पोलीस ठाण्यात दिली. कामत हा तडीपार असतांना देखील पुन्हा खंडणी वसुल करित असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र आगरकर यांनी कामत याला ताब्यात घेण्यासाठी आणि त्याचे प्रकरणी उघडकीस आणण्यासाठी सापळा रचला. उर्वरित रक्कम घेण्यासाठी कामत याने देशमुख याला बॅरेज रोडजवळ बोलाविले. तेथे आल्यावर कामत याने आपला सहकारी आरोपी राहुल बोंद्रे याला ते पैसे घेण्यासाठी पाठविले. देशमुख याने खंडीनीच्या रक्कमेपैकी 20 हजार रुपये आरोपीकडे देताच पोलीसांनी राहुल या आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता हे पैसे महेश कामत यानेच मागितल्याचे आणि त्यानेच पाठविल्याचे त्याने कबुल केले. आरोपीला खंडणी घेतांना ताब्यात घेतल्यावर पोलीसांनी कामत याच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घराला कुलुप होते. मात्र महेश कामत हा बाहेरुन कुलुप लाऊन आत बसल्याचा संशय पोलीसांना होता. पोलीसांनी कुलुप तोडुन त्याला घरातुन अटक केली. कामत हा तडीपार असतामना देखील घरातच लबुन बसला होता आणि तेथुनच खंडणी वसुलीची कामे करित होता.
महेश कामत याच्या विरोधात या आधी देखील मोठी कारवाई करण्यात ओली होती. मात्र तरी देखील त्याची गुन्हेगारी वृत्ती कमी होत नव्हती. त्यातच तडीपार असतांनाही तो पुन्हा घरातच राहिल्याने त्याच्यावर त्या प्रकरणातही गुन्हा दाखल केला आहे. तसेच खंडणी वसुली प्रकरणातही गुन्हा दाखल करण्यात आल आहे.