ठाण्यात पूर्ववैमनस्यातून १८ मोटारसायकलीं जाळणारा अवघ्या काही तासांमध्ये जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 06:22 PM2018-12-25T18:22:37+5:302018-12-25T21:14:50+5:30

ठाण्यात मोटारसायकली जाळण्याचे सत्र सुरुच असून मंगळवारी पुन्हा चंदनवाडी परिसरात १८ मोटारसायकलींना आगी लावण्याचा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून गौरव पालवी याने या वाहनांना आगी लावल्याची माहिती पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी दिली.

Man held who cremate 18 motorbyke at Thane | ठाण्यात पूर्ववैमनस्यातून १८ मोटारसायकलीं जाळणारा अवघ्या काही तासांमध्ये जेरबंद

नौपाडा पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्दे नौपाडा पोलिसांची कारवाईमंगळवारी पहाटेची घटनापोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी दिली माहिती

ठाणे: पूर्ववैमनस्यातून १८ मोटारसायकलींसह एका दुकानाला मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लावणाऱ्या गौरव महेश पालवी (२१, रा. चंदनवाडी, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी अवघ्या सात ते आठ तासांमध्येच जेरबंद केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी दिली. पालवी हा सिद्धू अभंगे टोळीशी संबंधित असून त्याबाबतचीही चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चंदनवाडीतील हनुमान सोसायटी बि विंग गाळा क्रमांक एकमध्ये येथे इमारतीमधील रहिवाशांनी उभ्या केलेल्या १८ मोटारसायकली तसेच इशा पॉवर लॉंंड्री या दुकानाला कोणीतरी आग लावल्याची घटना २५ डिसेंबर रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ठाणे अग्निशमन दलाच्या पाचपाखाडी येथील जवानांनी एक इंजिन आणि टँकरच्या मदतीने तासाभरात ही आग आटोक्यात आणली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकात जाधव आणि निरीक्षक संजय धुमाळ यांच्या पथकाने याप्रकरणी सीसीटीव्ही आणि खब-यांच्या आधारे सर्वात आधी ज्याची मोटारसायकल जाळण्यात आली. त्याची चौकशी केली. तेंव्हा यातील तक्रारदार इशा पॉवर लाँड्रीचे मालक प्रशांत भोईर यांचा पूर्वी रोशन दळवी याच्याशी वाद झाल्याची माहिती समोर आली. त्याचबरोबर कथित आरोपी गौरवशीही वाद झाल्याचे आढळले. घटनेच्या वेळी गौरव पहाटे १.३० वा. ठाणे स्टेशनला होता. त्यानंतर २ वाजून २० मिनिटांनी तो सोसायटीमध्ये आल्याचे सीसीटीव्हीच्या आधारे उघड झाले. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रशांत भोईर यांची गाडी जाळल्याची कबूली दिली. याच गाडीची धग इतर गाडयांना लागल्यामुळे १८ गाडया यात जळयाचेही उघड झाले.
...................

Web Title: Man held who cremate 18 motorbyke at Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.