ब्रह्मांड कट्टयावर मानसून स्पेशल गाण्याचा कार्यक्रम संपन्न, 'कारवाँ सुरीली यादोंका...' मध्ये रंगले कट्टेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:34 PM2018-07-24T15:34:00+5:302018-07-24T15:36:07+5:30
पावसाची गाणी ऐकण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम टाळ्या, डान्स, वन्समोरच्या जल्लोषात मोठ्या दिमाखात पार पडला.
ठाणे : ब्रह्मांड कट्टयावर सांज-स्नेह सभागृह, ब्रह्मांड पोलीस चौकी मागे, आझादनगर, ठाणे येथे हिंदी मराठी रोमंन्टीक गीतांचा सुरीला नजराणा.. भरत तांबे प्रस्तुत , इंडियन कराओके क्लब व प्रतिबिंब निर्मित'कारवाँ सुरीली यादोंका... '(मानसून स्पेशल) हा गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
गायक संदीप पेडणेकर ,.समीर कुलकर्णी भूषण लघाळे, संजय तिवारी भास्कर सोमनाथ, युसूफ खान,प्रदीप सोनसूरकर, राहूल भाटवडेकर तर गायिका अंजली बोरोले, माधुरी चोरगे अनघा देशपांडे, शीला फर्नांडिस भूमी जनबंधू, मिताली वसाडा यांनी सादर केला. कार्यक्रमाची संकल्पना संदीप पेडणेकर, तृप्ती चव्हाण तर खुमासदार निवेदक पंकज गुजराथी यांचे होते. कट्टयाच्या प्रथे प्रमाणे प्रथम स्थानिक रहीवाशांना त्यांच्या वैयक्तिक कलेचे सादरी करण करण्याची संधी देण्यात येते. त्या प्रमाणे सदाबहार व्यक्तिमत्व अरविंद विंचुरे काका यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून पांडुरंगाचे नामस्मरण केले. जादूगर मधुगंधा हीन् कलासंस्कारच्या अध्यक्षा वर्षा गंद्रे यांच्यावतीने परिसरात इको फ्रेंडली गणेशाची उपयुक्त माहीती दिली व शाडूमातूचे गणपती घ्या असे आवाहन केले तर मुलुंडच्या रसिक ग्रुपचे व विरंगुळा या सिनियर सिटीझन केंद्राचे ८० वर्षे वय असलेले श्री. हरिश्चद्र चाचड यांनी ब्रह्मांड कट्टयावर हजेरी लावली. त्यांचे ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव व अध्यक्ष महेश जोशी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. चाचड यांनी सुध्दा त्यांच्या स्वरचित कवितांचा काव्यसंग्रह ब्रह्मांड कट्ट्यास भेट केला व आषाढी एकादशी निमित्ताने एक सुंदर अभंग सादर केला आणि महम्मद रफी यांच्या पुण्यतिथीचे स्मरण म्हणून "ओ दुनिया के रखवाले" हे गीत पेश करुन रसिकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला निर्माता भरत तांबे यांचे स्वागत करुन निवेदक पंकज गुजराथी यांनी अत्यंत शांत, संयमी व धिरगंभीर स्वरात सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्वप्रथम गणेशवंदनेने कार्यक्रम सुरु झाला. तद्नंतर रीमझीम रुमझुम ह्या सुंदर अशा गाण्याने पाऊस गीतांना सुरुवात झाली. बाहेर पावसाची रिपरिप थांबली होती. पाऊस जवळजवळ थांबला होता पण आत सभागृहामध्ये सुंदर सुंदर गाण्यांची स्वरांची बरसात मात्र अविरतपणे होत होती. रसिक त्यात न्हाऊन निघत होते. ये रे घना ये रे घना, रीमझीम गिरे सावन, जिंदगी भर नही भूलेगी वो बरसात की रात, सावन का महिना, रीमझीम के गीत सावन गाये,इक लडकी भिगी भागीसी, मेघा छाये आधूरात, बोल रे पपीहरा, ये रात भिगी भिगी, तुम जो मिल गये हो, आज रपट जीये तो अशा एकापेक्षाएक अवीट गोडीच्या गाण्यांची बरसात सुरु होती. मध्येच प्रिती नांवाच्या ब्रह्मांडच्या बाल कलाकार मुलीने अजिब दास्तां है ये हे सदाबहार गीत सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. शेवटी शेवटी दिल तेरा दिवाना व डम डम डीगा डीगा या सारख्या गाण्यांनी प्रेक्षकांना ताल धरायला लावला. रसिकांचे पाय ह्या गाण्यांवर थिरकले. शेवटी ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक राजेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले तर महेश जोशी यांनी पाहुणे कलाकारांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सांगता केली.