मनविसेचा पदनियुक्ती सोहळा कार्यकर्त्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न, पदनियुक्त्याही केल्या जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 04:33 PM2018-12-02T16:33:55+5:302018-12-02T16:37:02+5:30

येणाऱ्या निवडणूका लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आज विधानसभेची कार्यकारिणी जाहीर केली.

Manavisee's posthumous celebrations concluded in the spontaneous response of the workers, the party also announced | मनविसेचा पदनियुक्ती सोहळा कार्यकर्त्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न, पदनियुक्त्याही केल्या जाहीर

मनविसेचा पदनियुक्ती सोहळा कार्यकर्त्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न, पदनियुक्त्याही केल्या जाहीर

Next
ठळक मुद्देमनविसेचा पदनियुक्ती सोहळा संपन्नपदनियुक्त्याही केल्या जाहीरमिळालेल्या पदांचा लोकसेवेसाठी वापर करा : संदीप पाचंगे

ठाणे : मनविसे आयोजित पदनियुक्ती सोहळा विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात रविवारी सकाळी घोडबंदर रोड येथे पार पडला. यावेळी विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष या पदांवर कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. काहींना बढती काहींची फेरनियुक्ती करण्यात आली. तसेच, काही नवोदीतांना संधी देण्यात आली. यावेळी मनविसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
येणारे वर्ष हे निवडणूकांचे वर्षे आहे. त्यादृष्टीने मनविसेने जोरदार बांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून कोपरी - पाचपाखाडी / ओवळा - माजिवडा विधानसभेची कार्यकारणी पाचंगे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आली. सर्व महाविद्यालयीन तरुणांना काम करण्याची संधी मनविसेच्या माध्यमातून मिळते. येणाºया काळातील निवडणूका लक्षात घेता ही बांधणी सुरू केली असल्याचे पाचंगे यांनी सांगितले. या सोहळ््यात कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेण्यात आला. यावेळी १५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मनविसे शहर अध्यक्ष किरण पाटील, शहर सचिव सचिन सरोदे, उपशहर अध्यक्ष दीपक जाधव, प्रमोद पताडे. संदीप चव्हाण हे उपस्थित होते. पाचंगे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, निवडणूकीसाठी तरुणांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार पोहोचविण्यासाठी भक्कम फळी तयार करायची आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. मिळालेल्या पदांचा लोकसेवेसाठी वापर करा. तुम्ही केलेल्या कामांचा कार्य अहवाल दर सहा महिन्यांनी पक्षाकडे सादर करा. राज ठाकरे यांचे विचार, पक्षांची धोरणे पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. तरुण मंडळींचा यावर जास्त वावर असतो. त्यामुळे सोशल मीडियाचा सक्षमपणे वापर करा असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी त्यांनी राजकारणात आलेल्या नवोदीतांना प्रोत्साहन दिले.

Web Title: Manavisee's posthumous celebrations concluded in the spontaneous response of the workers, the party also announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.