ठाणे जिल्ह्यातील खासदारांसह ६६ सदस्याना ४९७७५ मतदारांनी नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 19:04 IST2019-05-25T19:00:21+5:302019-05-25T19:04:34+5:30
ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघात ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले आहे. यातील ४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. यासाठी या मतदारांना नोटा बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावला

४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली
ठाणे: जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघात ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले आहे. यातील ४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. यासाठी या मतदारांना नोटा बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
या तिन्ही मतदार संघापैकी ठाणेलोकसभा मतदारसंघात २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना ११ लाख ७० हजार ९७० मतदारांनी मतदान केले आहेत. यातील २० हजार ४२५ मतदारांना विद्यमान खासदारांसह २३ उमेदवार नापसंत आहेत. यासाठी त्यांनी मतदानाचा हक्क बजावता नोटा बटन दाबून या उमेदवारांना नाकारले आहेत. याप्रमाणेच कल्याण लोकसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान खासदारांसह २८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना आठ लाख ९० हजार ६९२ मतदारांनी मतदान केले आहे. पण यातील १३ हजार १२ मतदारांनी विद्यमान विजयी खासदारालाही नाकारत या २८ उमेदवारांपैकी एकाला ही पसंत केले नाही. यामुळे त्यांनी नोटाचा वापर करून या उमेदवाराना नाकारले आहे. तर भिवंडी लोकसभेतील १५ प्रतिस्पर्धी उमेदवारांनाही १६ हजार ३३७ मतदारांना नाकारले आहेत. यासाठी त्यांनी नोटा बटन दाबून नापसंती दर्शवत मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात तसे दहा लाख पाच हजार पेक्षा अधिक मतदान झाले आहे.