शेतकरी संपामुळे कृषी उत्त्पन्न बाजार समितीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 05:18 PM2018-06-02T17:18:39+5:302018-06-02T17:18:39+5:30
60 हजार रुपयांचे नुकसान
डोंबिवली- शेतकरी संपावर गेल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज केवळ 98 ट्रकच मालाची आवक झाली आहे. बाजार समिताला शेतकरी संपामुळे 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे.
मुंबई, नवी मुंबई बाजार समितीपाठोपाठ कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती ही मोठी बाजार समिती गणली जाते. या बाजार समितीत दिवसाला 15 पेक्षा जास्त ट्रक माल येतो. हे ट्रक महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरुन येतात. कालपासून शेतकरी संप सुरु झाला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी बाजार समितीला फारसा फटका बसला नाही. मात्र, आज संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजार समितीत येणाऱ्या मालाची आवक घटली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून 78 ट्रक माल आला आहे. राज्याबाहेरील 22 ट्रक मालाचे आले आहेत. भाजीपाल्याचे 18 ट्रक व 30 टेम्पो माल आला. पालेभाज्यांचे पाच टेम्पो माल आला. अन्नधान्याचे 12 ट्रक, फुलांचे 9 टेम्पो, फळांचे दोन ट्रक व सात टेम्पो माल आला. एकूण 4 हजार 630 क्विंटल मालाची आवक झाली. निम्याहून कमी आवक झाली आहे. आज केवळ नाशिक, जुन्नर, नगर, आळेफाटा याच भागातून शेतमाल बाजारात दाखल झाला. मालाची आवक कमी झाल्याने बाजार समितीला किमान 60 हजार रुपयांचा फटका बसला आहे.