अल्पवयीन मुलाचा वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 09:09 PM2018-02-25T21:09:08+5:302018-02-25T21:09:08+5:30

अंबरनाथ येथील एका खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Minor child sex offense sexual abuse | अल्पवयीन मुलाचा वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलाचा वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार

Next

अंबरनाथ : अंबरनाथ येथील एका खासगी मराठी माध्यमाच्या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी आपल्याच वर्गमित्रावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ काढत तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अखेर ही बाब निदर्शनास आली आहे. या प्रकरणात पीडित विद्यार्थ्याने फिनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असून, या प्रकरणी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याविरोधात शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आणि देशात महिला तसेच अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अंबरनाथमध्येही लैंगिक अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ पूर्व भागातील एका खासगी शाळेतील ९ वीच्या इयत्तेत शिकणा-या एका अल्पवयीन विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गातील दोन अल्पवयीन विद्यार्थी परिसरातील पालिकेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. धक्कादायक बाब म्हणजे पीडित विद्यार्थ्याचा लैंगिक अत्याचार करतानाचा या दोन्ही विद्यार्थ्यांनी व्हिडीओही तयार केला होता. त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला धमकावत पैशांची मागणी करत, पैसै न दिल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घाबरलेला पीडित अल्पवयीन विद्यार्थी या दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना मागील काही दिवसांपासून घरातून पैसे आणून देत होता.

अखेर पैशांसाठी रोज दिल्या जाणा-या धमक्या आणि लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या धमकीला घाबरलेल्या पीडित विद्यार्थ्याने घरात फीनेल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या विद्यार्थ्याच्या लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओ त्यांच्याच परिसरातील एका तरुणाच्या हाती आल्याने त्याने या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. या सर्व घटनेची पीडित मुलाच्या पालकांनाही माहिती मिळताच त्यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दिली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी सर्व अल्पवयीन मुलांविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुलांची रवनागी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

Web Title: Minor child sex offense sexual abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.