ठाणे जिल्ह्यात २७ लाखांपेक्षा जास्त मुलां - मुलींसह विद्यार्थ्यांना गोवरसह रूबेला लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 07:11 PM2018-11-17T19:11:47+5:302018-11-17T19:18:58+5:30
जिल्ह्यातील दोन हजार ६० शाळा आणि एक हजार ६९३ अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थी आणि वीट भट्या, बांधकामांची ठिकाणे आदींसह गावपाड्यांमधील सुमारे २६ लाख ८५ हजार ५०१ मुला - मुलींना या गोवर व रूबेला या आजारांचे लसीकरण केले जाईल. ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ही मोहीम २७ नोव्हेंबरपासून राबवण्याचे निश्चित केले आहे.
ठाणे : जिल्ह्यातील लहान मुलांसह विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या दृष्टने भविष्यातील गोवरचे कायमस्वरूपी निर्मुलन व रूबेला आजारास केंद्र शासनाच्या मार्गदर्शनाने नियंत्रित ठेवले जात आहे. यासाठी जिल्ह्यातील दोन हजार ६० शाळा आणि एक हजार ६९३ अंगणवाडी केंद्रातील विद्यार्थी आणि वीट भट्या, बांधकामांची ठिकाणे आदींसह गावपाड्यांमधील सुमारे २६ लाख ८५ हजार ५०१ मुला - मुलींना या गोवर व रूबेला या आजारांचे लसीकरण केले जाईल. ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी ही मोहीम २७ नोव्हेंबरपासून राबवण्याचे निश्चित केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या समन्वय समितीची आढावा बैठक ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी घेतेल्या निर्णयानुसार जिल्ह्यात ही मोहीम हाती घेतली आहे. मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या या मोहिमेसाठी सर्व शाळा, नर्सरी आदींमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यातील या मोहिमेस यशस्वी करण्याचे आश्वासन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी दिले.
यावेळी उपस्थित डॉक्टरांसह संबंधीताना मार्गदर्शन करताना जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. विनायक जळगावकर यांनी या मोहिमेत लसीकरण झाले व काही आजार असल्या मुला - मुलींना ही अतिरिक्त लस टोचवून घ्यावयाची असल्याचे स्पष्ट केले. यासाठी ०.५ एमएलचे इंजेक्शन अतिशय सुरिक्षत असून ते उजव्या खांद्यावर वरच्या बाजूस देण्याचे मार्गदर्शनही त्यांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांना केले. दूरवरील गावे, पुनर्विसत वसाहती, बांधकामे, वीट भट्या, आदिवासी भाग आदी ठिकाणच्या मुलांना फिरत्या वाहनातून लसीकरण होईल. तसेच जिल्हा रु ग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालये, ग्रामीण आरोग्य केंद्र आदी ठिकाणी मात्र कायम स्वरूपी या गोवर, रूबेलाच्या लसीकरणची व्यवस्था केली आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनीष रेंघे आदीं यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व खासगी, शासकीय शाळा, महाविद्यालये,पालक, संस्थाचालक यांच्यासमवेत बैठका झाल्या असून त्यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचे या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
* जिल्ह्यातील २६८५५०१ लसीकरणाचे लाभार्थी
ठाणे पालिका सहा लाख आठ हजार ३२२ मुलांसह विद्यार्थी. भिवंडी पालिका क्षेत्रातील दोन लाख१६ हजार ८२१. कल्याण डोंबिवली पालिकेतील तीन लाख ५१ हजार ९८. मीरा भार्इंदरचे दोन लाख ८१ हजार ४९२. नवी मुंबई पालिकेतील सहा लाख आठ हजार ३२२. ठाणे पालिकेचे तीन लाख ८९ हजार ४२ विद्यार्थी. उल्हासनगरमधील एक लाख ४५ हजार १४५ . याप्रमाणेचे जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील सहा लाख ९३ हजार ५२० आदीं सुमारे २६ लाख ८५ हजार ५०१ विद्यार्थ्यांसह मुला-मुलीं या गोवर - रूबेला लसीकरणाचे लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे.