मुंबईच्या पोलीस कर्मचा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:41 AM2018-02-21T05:41:54+5:302018-02-21T05:42:00+5:30
सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून लुबाडणाºया मुंबई पोलीस दलाच्या एका कर्मचाºयास ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली.
ठाणे : सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून लुबाडणाºया मुंबई पोलीस दलाच्या एका कर्मचाºयास ठाणे पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याने लोकांना तब्बल ८५ लाख रुपयांचा गंडा घातला होता.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये राहणारे महेश पालिवाल हे इन्शुरन्स कंपनीत सेल्स मॅनेजर आहेत. ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये डिसेंबर २0१५ मध्ये त्यांचा परिचय अनंतप्रसाद पांडेशी झाला होता. आपण सीबीआयच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे हेड आहोत, असे त्याने सांगितले. दारू विक्रीचा परवाना मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने २0१६ मध्ये पालिवालकडून १६ लाख रुपये उकळले. त्यानंतर ठाण्यातील चितळसर येथे म्हाडाची दुकाने, चर्चगेट रेल्वेस्थानकावर स्टॉलसाठी आणि रेल्वेमध्ये टीसीची नोकरी मिळवून देण्यासाठी पालिवालांच्या मध्यस्थीने परिचितांकडून मोठी रक्कम लुबाडली. फसवणुकीचा हा आकडा ८५ लाखांच्या जवळपास आहे. डिसेंबर २0१७ च्या अखेरिस पालिवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दोन महिन्याच्या तपासानंतर सोमवारी पोलिसांनी अनंतप्रसाद पांडे याला नालासोपारा येथून अटक केली. आरोपीस न्यायालयाने मंगळवारी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.