आत्महत्येचे गूढ कायमच, बार गायिकेची ठाण्यात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 07:12 AM2017-12-01T07:12:53+5:302017-12-01T07:13:01+5:30

नौपाड्यातील एका बारमध्ये गाणाºया पश्चिम बंगालच्या तरुणीने रविवारी रात्री केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे. घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली.

 The mystery of suicides is always, suicidal times of the times, | आत्महत्येचे गूढ कायमच, बार गायिकेची ठाण्यात आत्महत्या

आत्महत्येचे गूढ कायमच, बार गायिकेची ठाण्यात आत्महत्या

Next

ठाणे : नौपाड्यातील एका बारमध्ये गाणाºया पश्चिम बंगालच्या तरुणीने रविवारी रात्री केलेल्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम आहे. घोडबंदर रोडवरील एका सोसायटीच्या इमारतीवरून आत्महत्या केली. तिने यापूर्वीही काही वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तपासामध्ये उघड झाली आहे.
पश्चिम बंगालची सुनीता दास (२८) नौपाड्यातील एका बारमध्ये गाणे गाण्याचे काम करायची. घोडबंदर रोडवरील कॉसमॉस ज्वेलर्समध्ये बाराव्या मजल्यावर ती भाड्याने राहायची. रविवारी रात्री उशिरा तिने इमारतीवरून उडी मारली. पोलिसांनी तिच्या फ्लॅटची पाहणी केली असता, तिथे मद्याचे ग्लास आणि अर्धवट जळालेल्या सिगारेट होत्या. तरुणी अविवाहित असून ती नशेच्या अधीन असावी, असा संशय आहे. तिच्या हातावर ब्लेडने कापल्याच्या जखमा दिसल्या. त्यावरून तिने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असे दिसत असल्याचे कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढोले यांनी सांगितले. तिच्या पश्चिम बंगालस्थित नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार, त्यांनी ठाण्यात येऊन मृतदेहाचा ताबा घेतला. नातलगांना सुनीता दासबाबत तपशीलवार विचारपूस करण्यात आली. तिचा स्वभाव, तिला काही अडचणी होत्या का, कुणाचा त्रास होता का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून घेण्यात आली. मात्र, असा कोणताही प्रकार नसल्याची माहिती नातलगांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सुनीताचे वास्तव्य असलेल्या कॉसमॉस ज्वेलर्स सोसायटीतील रहिवाशांकडूनही पोलिसांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्याकडूनही विशेष माहिती मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

कारण अद्याप अस्पष्ट; संबंधितांचे जबाब घेणार

आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नसल्याने ती नौपाड्यातील ज्या बारमध्ये कामाला होती, तेथील संबंधित लोकांचे जबाब नोंदवले जातील, अशी माहितीही पोलिसांनी दिली. सुनीता दासचा मोबाइल फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे. तिचे कॉल डिटेल्स पोलिसांनी मागवले असून ते प्राप्त झाल्यानंतर तिने शेवटचा कॉल किंवा मेसेज कुणाला केला होता, ती वारंवार कुणाच्या संपर्कात होती, इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title:  The mystery of suicides is always, suicidal times of the times,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.