नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी देणा-याचे नाव मात्र गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:27 PM2017-12-20T19:27:22+5:302017-12-20T19:43:33+5:30

दरोडे टाकून रोकड लुटणा-या सहा दरोडेखोरांनी तीन्ही दरोडयांची कबूली दिली आहे. दरोडयासह भाजप पुरस्कृत नगरसेवकाच्याही हत्येची ५० लाखांमध्ये सुपारी घेतल्याची माहिती त्यांनी दिल्याने पोलीसही अवाक झाले.

 The name of the bearer of the murder of corporator Kunal Patil is named after Guldasta! | नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी देणा-याचे नाव मात्र गुलदस्त्यातच!

नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची

googlenewsNext
ठळक मुद्दे‘त्या’ दरोडेखोरांनी दिली वाडयातील दरोड्याची कबुलीगोळीबार करुन तीन दरोडे टाकलेआणखी सहा साथीदारांचा शोध सुरु

ठाणे : भिवंडी परिसरातून अटक केलेल्या कैलास घोडविंदे याच्यासह सहा दरोडेखोरांनी वाडयात एका व्यापा-याच्या पायावर गोळीबार करुन सहा लाख ३० हजारांची रोकड लुटली होती. अशा तीन गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली. दरम्यान, भाजपा नगरसेवक कुणाल पाटील यांची ५० लाखांची सुपारी देणा-या नगरसेवकाचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे.
राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, कैलास घोडविंदे, विजय मेनबन्सी, कासीम अन्सारी आणि दिलीप कनोजिया यांची धरपकड केल्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक गंभीर गुन्हयांची कबुली ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला दिली. त्यांच्या आणखी सहा साथीदारांचाही शोध घेण्यात येत आहे. दरोड्याच्या तपासातच त्यांनी आणखी एक धक्कादायक माहिती दिली ती म्हणजे कल्याण डोंबिवलीचे भाजप पुरस्कृत नगरसेवक कुणाल पाटील यांना भाजपच्याच एका नगरसेवकाने ठार मारण्याची दिलेली सुपारी. त्या नगरसेवकाने ५० लाखांपैकी १० लाख रुपये आगाऊ दिले होते. पण, कुणाल घराबाहेर न पडल्यामुळे मारेकºयांचा डाव फिस्कटला. दरोडेखोरांनी ज्याचे नाव घेतले त्या नगरसेवकाची माहिती, त्यांचे आणि कुणाल यांच्यातले संबंध तसेच त्यांचे कोणा कोणाशी वैमनस्य आहे. याशिवाय, इतर माहिती गोळा करण्यात येत आहे. ज्याने माहिती दिली तो विजय मेनबन्सी तसेच संबंधित नगरसेवकाचे कॉल रेकॉर्डसह इतरही तपशीलाची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानंतरच यातील अधिकृत जबाबदार शिक्कामोर्तब होऊ शकेल, असे ठाणे ग्रामीणच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले.
अटकेतील या सहा जणांच्या टोळीने २२ जुलै २०१७ रोजी भिवंडीजवळील अंबाडी येथील ‘डायमंड वाईन्स’ च्या मालकाच्या वाहनाला मोटरसायकल आडवी लावून लुटले होते. त्यावेळी त्यांनी तिघांवर गोळीबार केला होता. यात एकाच्या जबड्यातून, दुसºयाच्या हातातून गोळी निसटली होती. तर तिसºयाच्या खांद्याला गोळी लागली होती. यावेळी त्यांनी पाच लाखांची रोकड लुटली होती. तर २२ आॅक्टोंबर २०१७ रोजी अंबाडीतील ‘पूजा ट्रेडर्स’च्या मालकावर गोळीबार करून एक लाखांची रोकड लुटली होती. तसेच वाडा येथील व्यापाºयाच्या पायावर गोळीबार करून त्यांनी सहा लाख ३० हजारांची रोकडही लुटल्याची कबुली दिली. या तीन दरोड्यांसह त्यांनी कुणाल यांच्या हत्येचीही सुपारी घेतली. पण ते यातून बचावले. या टोळीकडून तीन लाख ४० हजारांच्या रोकडसह चार रिव्हॉल्व्हर आणि १६ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.
गय केली जाणार नाही
कुणाल यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाºयाचे नाव पुढे आले तरी त्याबाबत खातरजमा झाली तर कोणाचीही गय केली जाणार नाही. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे केला जाईल, पोलीस यंत्रणा कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title:  The name of the bearer of the murder of corporator Kunal Patil is named after Guldasta!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.