नोकरीस लावण्याच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक, पोलिसांत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 09:19 PM2017-10-27T21:19:24+5:302017-10-27T21:19:40+5:30
भारत संचार निगम लिमिटेड येथे नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या पवारनगर येथील तरुणाकडून चार लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
ठाणे - भारत संचार निगम लिमिटेड येथे नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून ठाण्याच्या पवारनगर येथील तरुणाकडून चार लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पवारनगर येथे राहणारे विजय मोरे (५९) यांना मुंबईच्या सायन कोळीवाडा येथे राहणारा राजेश गोहर याने भारत संचार निगममध्ये ओळख असल्याची बतावणी करत ‘तुमच्या मुलाला ज्युनिअर इंजिनीअरपदावर नोकरीस लावून देतो’ असे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून ६ आॅक्टोबर २०१६ रोजी चार लाखांची रोकड घेतली. मात्र, मोरे यांच्या मुलाची भारत संचार निगमच्या ज्युनिअर इंजिनीअरपदी निवडही झाली नाही. त्यानंतर, वारंवार पैशांची मागणी करूनही गोहरने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर, याप्रकरणी त्यांनी २६ आॅक्टोबर रोजी चितळसर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक बी.जी. भुसारे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.