Video - राष्ट्रवादीचे सरकारविरोधात ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 03:02 PM2019-07-08T15:02:49+5:302019-07-08T16:16:19+5:30

ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला.

ncp agitation in thane against bjp | Video - राष्ट्रवादीचे सरकारविरोधात ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ आंदोलन

Video - राष्ट्रवादीचे सरकारविरोधात ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ आंदोलन

Next
ठळक मुद्देठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला.भाजपा सरकारच्या कार्यकाळात केवळ महाराष्ट्रातच जवळपास एक लाख 42 हजार कंपन्या बंद झाल्याने लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले.राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या या आंदोलनांत मोठ्या संख्येने युवा सामील झाले होते.

ठाणे - देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून दिवसेंदिवस कंपन्या बंद होत असल्याने अनेकांचे रोजगार हातातून निसटू लागले आहेत. त्या निषेधार्थ सोमवारी (8 जुलै) ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल बजाओ, सरकार को जगाओ’ असा नारा देत ढोल ताशांचा गजर करण्यात आला. दरम्यान, कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आज ठाण्यात ढोल वाजवले असले तरी वर्षावरही ढोल वाजवायला मागे हटणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला. 

भाजपा सरकारच्या कार्यकाळात केवळ महाराष्ट्रातच जवळपास एक लाख 42 हजार कंपन्या बंद झाल्याने लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार झाले तरीही हे सरकार कुंभकर्णाच्या झोपेतून जागे होत नाही, असा आरोप करीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष रविकांत वर्पे , प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे- नवी मुंबई प्रभारी अभिषेक बोके, ठाणे शहराध्यक्ष मोहसीन शेख, कार्याध्यक्ष संदेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली  ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर ढोल ताशांचा गजर करण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसच्या या आंदोलनांत मोठ्या संख्येने युवा सामील झाले होते. फडणवीस सरकार व भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी बूट पॉलिश, छत्री दुरुस्ती, चणेवाला असे नानाविध भूमिका साकारुन भाजपा सरकारवर  
यावेळी मेहबूब शेख यांनी सांगितले की, बेरोजगारांना या सरकारने रोजगार दिलेला नाही. आज बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील 1 लाख 42 हजार कंपन्या बंद पडल्या आहेत. यावरुन हेच लक्षात येते की नवीन रोजगार सोडा किती लोक बेरोजगार झाले असतील. म्हणून या बेरोजगारीच्या विरोधात आम्ही सातत्याने आंदोलने करतोय. पण, हे फडणवीस सरकार कुंभकर्णाच्या झोपेत आहे. अणि या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आम्ही ढोल वाजवतोय; आज आम्ही ठाण्यात ढोल वाजवलेत ; जर, तत्काळ रोजगारनिर्मिती केली नाही तर आम्ही वर्षा बंगल्यावर येऊन ढोल वाजवायला मागे पुढे पाहणार नाही.  

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, सामाजिक न्याय विभागाचे ठाणे अध्यक्ष कैलास हावळे, युवती अध्यक्षा प्रियांका सोनार, प्रदेश कार्यकारीणी सदस्य हैदर शेख, रवींद्र पालव, राहुल सिंग, दीपक पाटील, सुधीर शिरसाठ, अनिकेत चोरमले, सिद्धांत वटकर, करणा पाटील, संतोष मोरे, अजय मिश्रा, रोहित भंडारी, जावेद शेख, संदीप पवार  मौजम खान, तन्मय पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: ncp agitation in thane against bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.