इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार खेचून सरकारचा केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 03:44 PM2018-08-31T15:44:09+5:302018-08-31T15:47:17+5:30

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी महागाईच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी पेट्रोल पंपा पर्यंत कार खेचत नेण्यात आली. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

NCP's agitation against fuel price hike, prohibition of government pulling cars | इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार खेचून सरकारचा केला निषेध

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन, कार खेचून सरकारचा केला निषेध

Next
ठळक मुद्देपेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात अनोखे आंदोलनकाळे कमळ देऊन केला सरकारचा निषेध

ठाणे - महागाईने जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच मंगळवारपासून पुन्हा इंधनाचे दर वाढू लागले आहेत. या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चक्क कार ओढत तसेच दुचाकीला हातगाडीवर ठेवून पेट्रोलपंपापर्यंत नेण्यात आली. तसेच पेट्रोल पंपावर नागरिकांना काळ्या गुलाबाची प्रतिकृती देऊन दरवाढीचा आणि भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
          पेट्रोल, डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असल्याचा आरोप ठाणेराष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी केला. इंधन दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी राष्ट्रवादीतर्फे पक्ष कार्यालयापासून तीन पेट्रोलपंपापर्यंत अनोखी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये चक्क एक कार खेचत तसेच दुचाकींना धक्का मारत पेट्रोलपंप गाठण्यात आला. गरिबांची चेष्टा बंद करा, पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, मोदी सरकार हाय-हाय, पेट्रोल-डिझेल दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.
              पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी येणार्‍या  लोकांना काळे कमळ देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. हे कमळ देऊन दरवाढ करणार्‍या अशा सरकारला निवडून दिल्याची आठवण करून देण्यात आली. यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी सांगितले की, सबंध देशाचा विचार केल्यास राज्यात इंधनावर सर्वाधिक कर आकारले जात आहेत. महागाईने जनता मेटाकुटीला आलेली असतानाही अशी दरवाढ केली जात असल्याने गरीबांना जगावे कसे असा प्रश्न पडला आहे. आता असे जुलमी सरकार खाली खेचल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: NCP's agitation against fuel price hike, prohibition of government pulling cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.