विखुरलेल्या नाभिक समाजाने एकत्र येण्याची गरज- महापौर मीनाक्षी शिंदे

By जितेंद्र कालेकर | Published: January 13, 2019 10:37 PM2019-01-13T22:37:12+5:302019-01-13T22:45:09+5:30

नोकरी करणा-या आणि निर्व्यसनी मुलांना उपवर मुलींनी तर घर सांभाळणाºया सुशिक्षित तरुणींना उपवर मुलांनी नाभिक समाजाच्या वधू वर मेळाव्या प्रसंगी आपली पसंती दर्शविली. ठाण्यात झालेल्या या मेळाव्याला राज्यभरातून ८५ मुलांनी तर १३२ मुलींनी नोंदणी केली.

The need for a dispersed 'Nabhik' community to come together - Mayor Meenakshi Shinde | विखुरलेल्या नाभिक समाजाने एकत्र येण्याची गरज- महापौर मीनाक्षी शिंदे

नोकरी करणाऱ्या मुलांना मुलींंकडून प्राधान्य

googlenewsNext
ठळक मुद्देठाण्यातील वधू वर मेळाव्यात व्यक्त केले मतराज्यभरातील समाज बांधवांची उपस्थितीनोकरी करणाऱ्या मुलांना मुलींंकडून प्राधान्य

ठाणे: विखुरलेल्या नाभिक समाजाने वधु वर मेळाव्यांसारख्या कार्यक्रमांमधून एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. ठाणे पूर्व भागातील कोपरी येथे श्री संत सेना पुरोगामी नाभिक संघाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी वधू वर पालक परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करतांना त्या बोलत बोलत होत्या.
श्री संत सेना पुरागामी नाभिक संघाने कोपरीतील आनंद बँक्वेट हॉल येथे आयोजित केलेल्या वधु वर पालक परिचय कार्यक्रमाचे कौतुक करुन शिंदे यांनी संपूर्ण शहरात विखुरलेल्या नाभिक समाज बांधवांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. ब-याचदा अशा मेळाव्यांमध्ये केवळ पालकांची उपस्थिती असते. परंतू, तसे न होता उपवर मुला मुलींनीही आवर्जून येणे गरजेचे आहे. अशाच उपक्रमांमधून आपला समाज आणि बांधव एकत्र गुुंफला जात असतो. अशा प्रकारे विधायक उपक्रम संस्थेने राबविल्यास पालिकेतर्फे त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही आश्वासन महापौर शिंदे यांनी यावेळी दिले.
यावेळी राज्यभरातून ८५ मुलांनी तर १३२ मुलींनी या मेळाव्यामध्ये आपली नोंदणी केली. सरकारी नोकरी करणारा, वेल सेटल, उच्चशिक्षित, निर्व्यसनी आणि स्वत:चे घर अशा उपवर मुलाची अपेक्षा बहुतांश मुलींनी व्यक्त केली. तर मनमिळावू, घर सांभाळणारी आणि अनुरुप अशा मुलींची अपेक्षा मुलांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले, ‘लोकमत’चे प्रतिनिधी तथा संस्थेचे सल्लागार जितेंद्र कालेकर, हिंदू मुस्लीम एकता समितीचे शंकर राऊत, संस्थेचे माजी सचिव विठ्ठल दळवी, माजी अध्यक्ष अशोक राऊत, ज्ञानेश्वर शिंदे आणि सचिन शिंदे या प्रमुख पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सांगळे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, उपाध्यक्ष सचिन कुटे, सेक्रेटरी अरविंद माने यांच्यासह राज्यभरातून अनेक समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
जळगाव येथून आलेल्या जयविजय निकम दाम्पत्याने सात तासांमध्ये ६५१ महिलांचे हेअर कट करण्याच्या विश्व विक्रमाची नोंद बेस्ट इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २० आॅक्टोबर २०१८ रोजी जळगाव येथे केली. त्याबद्दल जयविजय निकम यांचा तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी झटणारे शंकर राऊत यांचा संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

 

Web Title: The need for a dispersed 'Nabhik' community to come together - Mayor Meenakshi Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.