नेपाळमधील विटी - दांडूच्या जागतीक स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींना दोन सुवर्ण पदक

By सुरेश लोखंडे | Published: January 4, 2019 03:16 PM2019-01-04T15:16:56+5:302019-01-04T15:22:15+5:30

काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणाºया पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके पटकवून जागतीक नावलौकीक प्राप्त केला, असे या कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे प्रशिक्षक विवेक कुवरा यांनी लोकमतला सांगितले.

In Nepal's VT-Dandu World Championship, tribal students - students have won two gold medals | नेपाळमधील विटी - दांडूच्या जागतीक स्पर्धेत आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींना दोन सुवर्ण पदक

पालघर जिल्ह्यातील या आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींनी जागतीक विटी दांडू (टिक टॉक) स्पर्धेत दोन्ही गटात दोन सुवर्ण पदक पटकून जागतीक नावलौकीक मिळवला आहे.

Next
ठळक मुद्देकाठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके

सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कुबेराची संपत्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी कुटुंबातीलखेळाडू होतकरून विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य होणे अपेक्षित आहे. पण त्यापासून वंचित असूनही खेळाडू वृत्ती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी कंपनीत काम करीत पैसे मिळवलेले. त्यातून नेपाळच्या कांटमांडू येथील स्पर्धेतेचे शुल्क भरणा-या पालघर जिल्ह्यातील या आदिवासी विद्यार्थी - विद्यार्थीनींनी जागतीक विटी दांडू (टिक टॉक) स्पर्धेत दोन्ही गटात दोन सुवर्ण पदक पटकून जागतीक नावलौकीक मिळवला आहे.
काठमांडू येथे जागतिक टिक टॉक (विटी-दांडू ) स्पर्धा १ ते २ जानेवारी दरम्यान पार पडली. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, जर्मनी, अफगाणिस्तान, कोरिया या आठ देशांतील विटी - दांडू खेळाडूंनी सहभाग घेतला. भारतीय संघाकडून खेळणा-या पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी पाच विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींनी या दोन्ही संघांनी पुरूष व महिला गटातील दोन सुवर्ण पदके पटकवून जागतीक नावलौकीक प्राप्त केला, असे या कोसबाड येथील विकासवाडी अध्यापक विद्यालयाचे प्रशिक्षक विवेक कुवरा यांनी लोकमतला सांगितले.
या विजेत्या पुरु ष संघाने जर्मनीला अंतिम सामन्यात पराभूत करून सुवर्ण पदक पटकावले. तर महिलांनी नेपाळच्या संघाला पराभूत करून सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. ग्रामीण इंडियाच्या भारतीय संघाकडून खेळणाºया पुरूष गटातील या पाच विजेत्यांमध्ये उपकर्णधार मेहुल नांगरे (डहाणू), चिनेश महाले (तलासरी), अतुल महाले(तलासरी), नित्यानंद तुंबडा (वाडा) आणि अजय नाट्या (तलासरी) यांचा समावेश आहे. तर महिला संघतील विजेत्यांमध्ये कीर्ती भरसट (विक्र मगड), कुसुम चौधरी (डहाणू) या विद्यार्थीनींचा समावेश आहे. या आदिवासी स्पर्धकांना प्रशिक्षक डहाणू येथील विवेक कुवरा विजय गुहे यांचे सखोल मार्गदर्शन लाभले. पालघर जिल्हा विटी दांडू असोसिएशनकडून या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून त्यांचे स्वागताची तयारी देखील सुरू झाल्याचे आदिवासी कार्यकर्ते गुरूनाथ सहारे यांनी सांगितले. पालघर जिल्हा आदिवासी समाजाकडून हार्दिक अभिनंदन
विजेत्या खेडूंप्रमाणेच वाडा तालुक्यातील इंदगाव येथील नित्यानंद तुंबडा याचे वडील दगावलेले आहे. आई शेत मजुरी करीत आहे. तर तो स्वत: कंपनीत काम करून पदवीचे शिक्षण घेत आहे. तरी देखील त्यांनी स्पर्धेसाठी सुमारे १७ हजार रूपयांचा खर्च स्वकष्ठाने प्राप्त केला आहे. त्याच्या प्रमाणेच सर्वच खेळाडू विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. आता जर्मनीमध्ये या टिक टॉक स्पर्धेचे सामने होणार आहेत. त्यासाठी या विद्यार्थ्यांना जावे लागणार आहे. या प्रमाणे जागतीक पातळी विटी - दांडूचे सामने रंगल्यानंतर हा खेळ आॅलंम्पीकच्या खेळांमध्ये समाविष्ठ होईल आणि शाळांमध्ये देखील तो खेळला जाणारअसल्याचे कुवरा यांनी सांगितले. या स्पर्धांसाठी एका विद्यार्थ्यास सुमारे १७ हजार पेक्षा जास्त खर्च आहे. हा खर्च जाणकार धर्मदाय संस्थांसह आदिवासी विकास विभागाकडून करण्याची अपेक्षा सहारे यांच्यासह प्रशिक्षक कुवरा यांनी व्यक्त केली. त्यासाठी ते येथील अपर आयुक्त कार्यालयाच्या आदिवासी विकास विभागास साकडे घालण्याच्या तयारीत आहे.
 

Web Title: In Nepal's VT-Dandu World Championship, tribal students - students have won two gold medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.