संगीत कट्टा ३२ वर 'गाने नुराने नये पुराने' कार्यक्रमात नव्या जुन्या गाण्यांची सुरेल मेजवानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 04:07 PM2019-01-12T16:07:50+5:302019-01-12T16:10:20+5:30
संगीत कट्टा ३२ वर 'गाने नुराने नये पुराने' कार्यक्रमात नव्या जुन्या गाण्यांची सुरेल मेजवानी रसिकांना मिळाली.
ठाणे : 'गाने नुराने नये पुराने' म्हणजे जुन्या नवीन मराठी हिंदी गाण्यांची सुरेल मेजवानी. संगीत कट्टा ३२ मध्ये 'सामक' प्रस्तुत आरोही....गाने नूराने नये पुराने ह्या वाद्यवृंदात भावगीतापासून फिल्मी गाण्यांची पेशकश करून रसिक श्रोत्याचें मनोरंजन केले.
सदर कार्यक्रमच्या सादरकर्त्या मनीषा वायंगणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील विविध गाण्यांचे सादरीकरण करून संगीतकट्ट्यावर जणू संगीताचे अनोखे विश्व उभारले. मनीषा वायंगणकर यांनी 'मोगरा फुलला', 'ए दिल मुझको बता'; विद्याधर गोरे ह्यांनी 'फिरत्या चाकावरती';महिंदर खामकर यांनी 'मैने तेरे लिये ही' , 'डम डम डिगा डिगा'; योगेश भिडे यांनी 'कल हो ना' हो,'घन आज बरसे', 'मल्हारवारी'; तन्वी हुलावळे यांनी 'अधीर मन झाले', सनवर मिर्झा यांनी 'दिल मै हो तुम', 'झूम झूम झुमरू' या गीतांचे सादरीकरण केले. "गाने नुराने नये पुराने" मध्ये सादर झालेली 'शुक्रतारा मंदवारा', 'दिवाना हुवा बादल'(मनीषा-विद्याधर), 'का कळेना कोणत्या क्षणी'(मनीषा- योगेश), 'दिल की नजरसे'(तन्वी-महिंदर), 'एक मै और एक तू' (मनीषा-सनवर), 'एक मंजिल राही दो'(मनीषा-सनवर), 'गोमू संगतीन माझ्या'(तन्वी-विद्याधर) ह्या युगुल गीतांनी कार्यक्रमाची रंगत अजून वाढवली.मल्हारवारी हे गाने प्रेक्षकांच्या काळजाला स्पर्शून गेले तर झुमरू गाण्याने रसिकांना किशोर कुमार आठवला. कार्यक्रमाच्या शेवटी मनीषा वायंगणकर यांच्या 'ये मेरे वतन के लोगो' गीताच्या सादरीकरणाने उपस्थित श्रोते भावुक झाले.सदर संगीत कट्ट्याचे निवेदन राजन मयेकर आणि माधुरी बागडे यांनी केले. संगीत कट्ट्याची सुरुवात प्रथेप्रमाने प्रेक्षक प्रतिनिधी पुरुषोत्तम गांगल यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.