दाऊद इब्राहिमच्या निकटस्थासह त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:28 PM2018-02-16T18:28:56+5:302018-02-16T18:32:23+5:30

Offence registered against associates of Dawood Ibrahim in Thane | दाऊद इब्राहिमच्या निकटस्थासह त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात फौजदारी कारवाई

दाऊद इब्राहिमच्या निकटस्थासह त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात फौजदारी कारवाई

Next
ठळक मुद्देइमारतीच्या भागिदारीचा वादअंबरनाथच्या बांधकाम व्यावसायिकास धमक्यारियाज भाटीचा पोलिसांकडून शोध

ठाणे : इमारतीच्या वादातून अंबरनाथ येथील एका बांधकाम व्यावसायिकाचे बंदुकीच्या धाकावर अपहरण करून त्याला धमकी देणार्‍या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या निकटस्थासह त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने गुरूवारी रात्री ही कारवाई केली.
अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक सुरोजित मनिंद्र रॉय यांनी एप्रिल २00८ मध्ये अंधेरी स्पोर्टस् कॉम्प्लेक्सजवळच्या स्टेडियम व्ह्यू को-आॅपरेटिव्ह सोसायटीची जमीन विकसित करण्यासाठी घेतली होती. त्यासाठी रॉय यांनी त्यांच्या रॉय अ‍ॅण्ड असोसिएटस्च्या नावे स्टेडियम व्ह्यू को-आॅपरेटिव्ह सोसायटीसोबत रितसर करारनामा केला होता. डिसेंबर २00९ मध्ये आर्थिक अडचणींमुळे त्यांनी या कामासाठी मितेश रुगाणी आणि नितीन रतिलाल ढक्कन यांच्या मालकीच्या बोरिवली येथील सॉलिटर रिअल्टर्ससोबत भागिदारी केली. त्यानंतर ए.आर.के. डेव्हलपर्सचे भागीदार रियाज भाटी आणि अफगान बाबू खान यांनी रॉय यांना करारनामा रद्द करण्यासाठी फोनवरून धमक्या देण्यास सुरूवात केली. करारनामा रद्द करण्यासाठी सही न दिल्यास टोळीतील साथीदारांच्या मदतीने ठार मारण्याच्या धमक्या रॉय यांना मिळू लागल्या. आॅगस्ट २0१२ मध्ये अफगान खान आणि रियाज भाटी त्यांच्या साथीदारांसोबत रॉय यांच्या कार्यालयात गेले. त्यांनी रॉय यांच्यावर बंदूक रोखून पुन्हा धमक्या दिल्या. त्यानंतर १५ दिवसांनी आरोपींनी एका कारमध्ये बळजबरी बसवून वांद्रे येथील निबंधक कार्यालयात नेले. तिथे करारनामा रद्द करण्याच्या कागदपत्रांवर आरोपींनी आपल्या सह्या घेतल्याचे रॉय यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. ठरल्याप्रमाणे आरोपींनी स्टेडियम व्ह्यू को-आॅपरेटिव्ह सोसायटीच्या इमारतीमध्ये ४५00 चौरस फुटाचे बांधकाम आणि १ कोटी रुपये न देता केवळ ३0 लाख रुपये दिले. ठरल्याप्रमाणे आपला हिस्सा मागितला असता आरोपींकडून ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, असे रॉय यांनी म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीवरून ए.आर.के. डेव्हलपर्सचे भागीदार रियाज भाटी, अफगान बाबू खान आणि कमल जेदवानी यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तियांपैकी एक असलेल्या रियाज भाटी आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. अंबरनाथ येथील एका बांधकाम व्यावसायिकास त्यांनी धमकावल्याचा आरोप आहे.

Web Title: Offence registered against associates of Dawood Ibrahim in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.