ठाण्याच्या डोंगरीपाडयातही तीन मोटारसायकली पेटविणाऱ्याला पकडले

By जितेंद्र कालेकर | Published: December 15, 2018 05:00 AM2018-12-15T05:00:01+5:302018-12-15T05:00:02+5:30

ठाण्यात वाहनांना आगी लावण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये तिस-यांदा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार घडला. डोंगरीपाडा येथे झालेल्या या तिस-या घटनेत चेतन ठाकूर या तडीपार गुंडाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

One held who set 3 bikes on fire at Dongripada, Thane | ठाण्याच्या डोंगरीपाडयातही तीन मोटारसायकली पेटविणाऱ्याला पकडले

कासारवडवली पोलिसांची कामगिरी

Next
ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांची कामगिरीदहशतीसाठी तडीपार गुंडाचे कृत्यदोन वर्षांपूर्वीही जाळल्या होत्या गाडया

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : गणेशवाडी, लोकमान्यनगर पाठोपाठ आता डोंगरीपाडा परिसरातही तीन मोटारसायकलींना आगी लावण्याचे प्रकार शुक्रवारी पहाटे २ वा. च्या सुमारास घडले. याप्रकरणी चेतन आनंता ठाकूर (२१, रा. डोंगरीपाडा, ठाणे) या तडीपार गुंडाला अटक केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली.
आठवड्यापूर्वी ठाणे महापालिकेजवळील गणेशवाडी भागात पूर्व वैमनस्यातून एकाने नऊ मोटारसायकली जाळल्याचा प्रकार घडला होता. सीसीटीव्हीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. दुसºया घटनेत लोकमान्यनगरात एका मद्यपीने विनाकारण एक दुचाकी पेटविल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. त्यालाही वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यापाठोपाठ १४ डिसेंबर रोजी पहाटे २ वा. च्या सुमारास चेतन या तडीपार मद्यपी गुंडाने डोंगरीपाडा भागात दोन दुचाकी पेटविल्या. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार सुजीत खरात, विश्वनाथ दुर्वे आणि वसंत पाटील यांच्या पथकाने त्याला खब-यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी अटक केली. विशेष म्हणजे यातील दुचाकी पेटविल्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल होण्यापूर्वीच कासारवडवली पोलिसांनी तपास सुरू केला होता. दुपारी तक्रार दाखल झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत या आरोपीला पकडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डोंगरीपाडा भागातील तीन मोटारसायकलींना आगी लावल्याची तसेच तीन कारच्या काचा फोडल्याची चेतन ठाकूरने कबूली पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी दोन गुन्हे कासारवडवली पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल झाले आहेत. यापूर्वीही २०१६ मध्ये गाडया जाळण्याचे प्रकार त्याने केले होते. गाडया जाळणे, चो-या करणे आणि हाणामा-या करणे असे सात गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. आधी गाडया जाळण्याच्या प्रकरणात तयाला अटक केल्यानंतर पुन्हा गाडयांच्या काचा फोडण्याच्या प्रकरणातही त्याला अटक केली जाईल. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई केली जाणार असल्याचे ढोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: One held who set 3 bikes on fire at Dongripada, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.