भारतीय रेल्वेचा वाढदिवस उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 04:09 PM2018-04-16T16:09:28+5:302018-04-16T16:09:28+5:30

भारतीय रेल्वेला 165 वर्षे पूर्ण

people celebrate 165th birthday of indian railways | भारतीय रेल्वेचा वाढदिवस उत्साहात साजरा

भारतीय रेल्वेचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next

डोंबिवली- ठाणे रेल्वे स्थानकात भारतीय रेल्वेचा 165 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारतीय रेल्वे हा सर्वसामान्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असून त्यामुळेच तिला जीवनवाहिनी असे म्हटले जाते. मुंबईसह उपनगरातील 85 लाख रेल्वे प्रवाशांसह देशभरात करोडो प्रवाशांसाठी गेली शेकडो वर्षे रेल्वे अविरत धावत आहे. 'ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या रेल्वे सेवेत आगामी काळात आमूलाग्र बदल घडणार असून प्रवाशांचा प्रवास अधिकाधिक सुखकर करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे', असे प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी केले.

ठाणे रेलवे स्थानकात हा सोहळा मोठ्या उत्साहात सोमवारी संपन्न झाला. उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था, ठाणे रेल्वे प्रवासी संस्था यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेल्या 5 वर्षांहून अधिक वर्षे केला जात आहे. त्यासाठी आज स्थानकात अनेक संघटनाचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते. या वाढदिवसाचे निमित्त साधून कल्याण डोंबिवली स्थानकात महाराष्ट्र प्रवासी संघटना यांनी प्रवाशांच्या वाढत्या अपघातांबद्दल रेल्वेचा निषेध केला. कल्याण स्थानकाबाहेर आणि डोंबिवलीत रामनगर हद्दीत हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पोलिसांनी परवानगी नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे प्रवासी संघटनेच्या आंदोलनाला फारसं यश मिळालं नाही. कर्जत स्थानकातही रेल्वेच्या वाढ दिवसाबद्दल रांगोळी काढण्यात आली होती. वाफेचे इंजिन काढून त्यातून रेल्वेच्या 165 वर्षांचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्न तेथील प्रवासी संघटनेने केला.
 

Web Title: people celebrate 165th birthday of indian railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.