ठाण्यामध्ये रेखाटले गजानन महाराजांचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:08 AM2017-12-27T03:08:12+5:302017-12-27T03:08:14+5:30
ठाणे : फेब्रुवारी महिन्यात येऊ घातलेल्या गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ठाण्यातील गजानन महाराजांच्या मठात सुप्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी व त्यांच्या टीमने ८ बाय ४० फुटांचे शेषशायी गजानन महाराजांचे चित्र रेखाटले आहे.
ठाणे : फेब्रुवारी महिन्यात येऊ घातलेल्या गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त ठाण्यातील गजानन महाराजांच्या मठात सुप्रसिद्ध चित्रकार सदाशिव कुलकर्णी व त्यांच्या टीमने ८ बाय ४० फुटांचे शेषशायी गजानन महाराजांचे चित्र रेखाटले आहे. या भव्य चित्रात गजानन महाराजांचे २१ अध्याय त्यांनी दाखविले आहे. हे मनमोहक चित्र येत्या गुरूवारपासून सर्व भक्तांना पाहता येणार आहे.
राम मारुती रोड येथे गेल्या ३९ वर्षांपासून गजानन महाराजांचे प्रसिद्ध मठ आहे. ज्येष्ठ चित्रकार कुलकर्णी हे गेल्या सहा वर्षांपासून महाराजांच्या प्रगट दिन जवळ आला की त्याच्या आसपासच्या कालावधीत नेत्र दिपून टाकणारे भव्यदिव्य चित्र रेखाटत असतात. आतापर्यंत त्यांनी त्यांचे एकेक अध्याय दाखविले आहेत. गेल्या वर्षी २१ अध्याय त्यांनी काढले होते. यंदा काहीतरी नविन चित्र काढावे अशी संकल्पना कुलकर्णींच्या डोक्यात होती. नेमके काय काढावे यावर त्यांनी काही दिवस विचारमंथन केले. शेषाशायी गजानन महाराज असे चित्र कुठेही नाही, त्यामुळे हे आगळे वेगळे चित्र महाराजांच्या भक्तांसमोर आणावे यासाठी त्यांनी एका कागदावर हे स्केच काढले आणि तीन दिवसांत त्यांनी मठाच्या मागील भिंतीवर हे चित्र रेखाटले. यात त्यांनी नागावर पहुडलेले महाराज दाखविले आहे. त्यांच्या अंगावर २१ अध्यायांची चित्रे दाखविली आहेत, चेहºयाभोवती प्रभामंडळ दाखविले आहे. समुद्रातील पाण्यात कासव, मासे, मगर त्यांनी दाखविले आहे. बाजूलाच ते लक्ष्मी यंत्र देखील काढणार असल्याचे सांगितले. या चित्रासाठी ११ रंगांचा वापर झाला असून पाच हजाराचे रंग वापरल्याचे कुलकर्णी म्हणाले. शनिवारी चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. मंगळवारी पूर्ण झाले आहे. स्वाती मोदगी, आदित्य कानडे, प्रिती घोंगडी, प्राची पाटणकर यांचा हातभार लागला.
>मठाच्या मागील भिंत ही मोकळीच असते. ती भिंत मोकळी न राहता त्यावर कल्पनाचित्र रेखाटले जावे अशी संकल्पना होती. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून या भिंतीवर चित्र काढले जाते.
- विनय जोशी, संस्थापक, गजानन महाराज मठ