बंटी-बबली ताब्यात, मॅजिक पेनची कमाल, कर्जदारांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 02:20 AM2017-12-15T02:20:15+5:302017-12-15T02:20:21+5:30

कर्ज वळते करण्यासाठी स्टेट बँकेच्या नावे घेतलेल्या धनादेशावरील नाव आणि रक्कम मॅजिक पेनने बदलून लोकांची फसवणूक करणारी बंटी आणि बबलीची जोडी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

In possession of the Bunty-Babli, the maximum of the magic pen, the borrows | बंटी-बबली ताब्यात, मॅजिक पेनची कमाल, कर्जदारांना गंडा

बंटी-बबली ताब्यात, मॅजिक पेनची कमाल, कर्जदारांना गंडा

googlenewsNext

ठाणे : कर्ज वळते करण्यासाठी स्टेट बँकेच्या नावे घेतलेल्या धनादेशावरील नाव आणि रक्कम मॅजिक पेनने बदलून लोकांची फसवणूक करणारी बंटी आणि बबलीची जोडी ठाणे पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. राज्यभरात अनेक कर्जदारांना त्यांनी गंडा घातला आहे.
जहीर काजी निझाम आणि सारिका बबन इनामदार ही आरोपींची नावे आहेत. लोकांना फसविण्याची त्यांची कार्यपद्धती मजेशीर आहे. शहरातील नामांकित डॉक्टर किंवा मोठ्या व्यावसायिकांची यादी आरोपी जस्ट डायल या संकेतस्थळावरून मिळवायचे. सावज निश्चित झाले की स्टेट बँकेचा गणवेश घालून जहीर त्याची प्रत्यक्ष भेट घ्यायचा. आपले कर्ज बँकेमध्ये वळते केल्यास कर्जाचे हफ्ते कसे कमी होतील, हे तो सावजाला समजावून सांगायचा. सावज तयार झाला की, त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ३00 ते ३५0 रुपये एवढे नाममात्र शुल्क आणि तेदेखील धनादेशाच्या स्वरूपात घेतले जायचे. धनादेश ‘एसबीआय’च्या नावे आणि तोही अकाऊंट पेयी द्यायचा असल्याने जहीरवर कुणीही संशय घेत नव्हते. धनादेश लिहिण्यासाठी जहिर बोलण्याच्या ओघात स्वत:चा मॅजिक पेन द्यायचा. तेथून निघाल्यानंतर धनादेशावरील एस.बी.आय.च्या प्रत्येक अक्षरामध्ये मोकळी जागा असल्यास एसच्या पुढे सारिका, बीच्या पुढे बबन आणि आयच्या इनामदार लिहून जहिर त्याच्या महिला साथीदारास बँकेत पाठवायचा. मॅजिक पेनने अकाउंट पेयी धनादेशावरील रेषा खोडून तो बेअरर केला जायचा. त्यामुळे जहीरची साथीदार सारिका तो धनादेश बँकेतून लगेच वठवायची. तत्पूर्वी धनादेशावरील रक्कमही आरोपी वाढवायचे. आरोपींनी या पद्धतीने राज्यभरात गंडा घातला.
जहिर मूळचा सातारा येथील असून, त्याच्याजवळून हस्तगत केलेल्या मोबाईल फोनमध्ये जवळपास ५0 डॉक्टरांचे नंबर पोलिसांना आढळले. या सर्वांची त्याने फसवणूक केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. स्कोडासारख्या महागड्या गाडीत फिरणारा जहीर मोबाईल फोन वेळोवेळी बदलायचा. फसवणुकीच्या प्रत्येक प्रकरणासाठी तो नवीन मोबाईल फोन आणि सीम कार्ड विकत घ्यायचा. फसवणुकीचे एक प्रकरण झाले की तो मोबाईल फोन जहिर ‘ओएलएक्स’वर विकायचा. नवीन प्रकरणासाठी दुसरा मोबाईल फोनही ‘ओएलएक्स’वरूनच विकत घ्यायचा. मालवणी येथे त्याला अशाच एका प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. तेथून सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा हा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

६0 ठिकाणी शोध
जहीर राहण्याचे ठिकाण वेळोवेळी बदलायचा. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहायक पोेलीस निरीक्षक शिवाजीराव चव्हाण बरेच दिवसांपासून त्याच्या मागावर होते. धुळ्यापासून मुंबईतपर्यंतचे जवळपास ५0 ते ६0 पत्ते शोधून काढल्यानंतर, ही जोडी पोलिसांच्या हाती लागली.

Web Title: In possession of the Bunty-Babli, the maximum of the magic pen, the borrows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा