पडघा विजकेंद्रात बिघाड झाल्यानं डोंबिवलीत वीजपुरवठा खंडीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 02:53 PM2017-12-09T14:53:06+5:302017-12-09T14:53:16+5:30
डोबिवली, कल्याण शीळ रोडवर मुख्य वीजपुरवठा केंद्राच्या आणि शहरातील अन्य सबस्टेशनमध्ये पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली.
डोंबिवली- डोबिवली, कल्याण शीळ रोडवर मुख्य वीजपुरवठा केंद्राच्या आणि शहरातील अन्य सबस्टेशनमध्ये पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनमध्ये तांत्रिक समस्या उद्भवली. एमयडीसीच्या 100 केव्ही तर पाल येथील केंद्रातून 220 केव्ही ब्रीज पुरवठा शहरभर केला जातो. त्या मुख्य लाईनला वीज पुरवठा होत नसल्याने शहरात वीज पुरवठा अर्धा तासापासून बंद आहे. सोमवारच्या ओखी चक्रीवादळामूळे शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता, त्यानंतर मंगळवारी काही भागात समस्या होती, बुधवारी चक्रीवादळ शमले पण वीज पुरवठ्याच्या ट्रिप होण्याच्या समस्या सुरूच होत्या. त्याचा परिणाम शहरातील इंटरनेट सुविधा पुरवण्यावर झाला, त्यामुळे असंख्य ग्राहक नाराज झाले होते. वीज पुरवठा सुरू असला तरी इंटरनेटचा स्पीड मिळत नसल्याची तक्रार आहेतच.
पडघा येथे पारेशनची 400 केव्ही विजवाहिनीचा ब्रेकर तुटल्याने समस्या उदभवली. त्यामुळे कल्याण पूर्व पश्चिम, उल्हासनगर, बदलापूर, डोंबिवली व ठाण्याचा काही भाग प्रभावित झाला आहे. पडघ्याचे काम अंतिम टप्यात असून टप्याटप्याने सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत होणार आहे, अशी माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी भरत पवार यांनी दिली.