पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ठाणे जिल्ह्यात २२ महिलांनी संवाद साधत व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे केला ई -गृहप्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:12 PM2018-10-19T17:12:01+5:302018-10-19T17:17:37+5:30

पंतप्रधान शुक्रवारी शिर्डी दौ-यावर असताना त्यांनी राज्यातील २९ जिल्ह्यांमधील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश करणारा कार्यक्रम शिर्डी येथून पार पाडला. यावेळी राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’ पार पाडत असतान पंतप्रधानांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. राज्यातील अन्य जिल्ह्यातील तुलनेत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ठाणे जिल्हा अव्वल आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याचे कौतूक करीत पंतप्रधानांनी या २२ महिलां लाभार्थ्यांशी सर्वाधिक वेळ संवाद साधला.

With the Prime Minister Narendra Modi, 22 women interacted with the Videoconferencing conference in Thane. | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ठाणे जिल्ह्यात २२ महिलांनी संवाद साधत व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे केला ई -गृहप्रवेश!

यावेळी महिलांना गृह प्रवेशासाठी मंगलकलश भेट देण्यात आला

Next
ठळक मुद्दे राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’राज्यातील अन्य जिल्ह्यातील तुलनेत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ठाणे जिल्हा अव्वल ठाणे जिल्ह्याचे कौतूक करीत पंतप्रधानांनी या २२ महिलां लाभार्थ्यांशी सर्वाधिक वेळ संवाद साधलाघरकुलांवर जगप्रसिध्द ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी पाहून पंतप्रधानांनी भावूक होत ठाणे जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधण्यासाठी भरपूर

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर असताना त्यांनी ठाणे जिल्ह्यातील २२ महिलांशी व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधला. यावेळी या महिलांनी पंतप्रधानांशी संवाद साधत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’ केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हीसीडीसी सभागृहात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम पंतप्रधानांच्या साक्षिने पार पडला.
पंतप्रधान शुक्रवारी शिर्डी दौ-यावर असताना त्यांनी राज्यातील २९ जिल्ह्यांमधील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा ई गृहप्रवेश करणारा कार्यक्रम शिर्डी येथून पार पाडला. यावेळी राज्यातील सुमारे दोन लाख ४४ हजार ४४४ घरकुलांमध्ये ‘ई गृहप्रवेश’ पार पाडत असतान पंतप्रधानांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. राज्यातील अन्य जिल्ह्यातील तुलनेत पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांमध्ये ठाणे जिल्हा अव्वल आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याचे कौतूक करीत पंतप्रधानांनी या २२ महिलां लाभार्थ्यांशी सर्वाधिक वेळ संवाद साधला. ‘रहने के लिए न था मकान पक्का, न था खुद कि पहचान का शिक्का, फिर मोदीजीने दिया कृपाप्रसाद, प्रधानमंत्री ग्राम योजनासे मिला आवास ! अशा आशयाची कविता सादर करत ठाणे जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी महिलांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुसवांद साधत ई-गृहप्रवेश केला.
पारंपरिक वेशभूषेत आलेल्या या महिलांना पंतप्रधानांनी एखादी कविता किंवा गाणे सादर करा असे मराठीतून सांगितले, त्यावेळी उपस्थित महिलांपैकी हिरा गुरु नाथ वाघ यांनी डोंगरी शेत माझं बेनु ग कसी... आलय वरीस राबवून मराव किती .... हे कवी नारायण सुर्वे यांचे गीत सादर करत वाहवा मिळवली.सुरेखा सुनिल भगत या महिल कविता गायली. महिलांनी गृहप्रवेशासाठी केलेली घटस्थापना, तुळशी वृंदावन आदींना फुलांनी सजवून मांडलेली गृहप्रवेश् पुजा पाहावून पंतप्रधान फार खूष झाले. तर यावेळी सुनिता प्रदीप बराफ या महिलेने पंतप्रधानांशी थेट संवाद साधून पंतप्रधानांशी घरकुलांचा लाभ मिळाल्याचे समाधान व्यक्त केले. ‘आवास योजनेमुळे घरातील वातावरण सुखी समाधानी झाले असून पक्या घरात राहायला मिळालं, मोदीजी तुम्हाला धन्यवाद ! अशा शब्दात पंतप्रधानांचे सुनिता यांनी आभार व्यक्त केले. मोदीजीनी देखिल टेक्नोलॉजीमुळे तुमच्या घरी मी प्रवेश केल्याचे सांगत गरिबीशी मुकाबला करण्यासाठी मुलांना शिक्षण द्या असे आवर्जून सागितले सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण आदिवासीभागात बांधण्यात आलेल्या घरकूलांचा व्हीडीओ देखील पंतप्रधानानी आत्मीयतेने पाहिला. या घरकुलांवर जगप्रसिध्द ‘वारली’ चित्रांची रंगरंगोटी पाहून पंतप्रधानांनी भावूक होत ठाणे जिल्ह्यातील महिलांशी संवाद साधण्यासाठी भरपूर वेळ देत समाधान व्यक्त केले. या ‘वारली’ कलेचा वापर केल्याने घराला आधुनिक रूप आल्याचे सांगत वारली कलेचे पंतप्रधानांनी यावेळी कौतुक केल्याचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी रूपाली सातपुते यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या या ई गृहप्रवेश कार्यक्रम, ठाणे जिल्ह्यासाठी ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेव्दारे पार पडला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार आदी अधिका-यांसह २२ घरकूल लाभार्थी सर्व महिलां हिरव्या रंगाचा शालू परिधान करून या ई गृहप्रवेश कार्यक्रमात समावेश होता. यावेळी महिलांना गृह प्रवेशासाठी मंगलकलश भेट देण्यात आला. यावेळी संबंधीत विस्तार अधिकारी व ग्राम सेवक आदीं यावेळी सभागृहात उपस्थित होते. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जिल्ह्यच्या ग्रामीण भागात तीन हजार ७४० घरकुल बांधण्यात आली. तसेच शबरी, रमाई, आदिम हा राज्य पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सुद्धा पक्की घर बांधण्यात आली आहेत. यंदाचे असणारे ४६२ लक्षांक देखिल पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.


** ई गृहप्रवेशसाठी सहभागी महिला - यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील चामटोली येथील बारकी हरिश्चंद्र हंबीर, मांगल दिलीप केवारी, काशीबाई जेठ्या हंबीर. तर भिवंडी तालुक्यातील अकलोली येथील वैशाली विलास घाटाळ, सीता माणिक मोरे, द्रौपदी शांताराम भड, सुनिता प्रदिप बरफ, आणि रेखा बाळाराम गडग . या महिला होत्या. याशिवाय कल्याणमधील घोटसई येथील अलका गणेश भगत, रेणुका कैलास भगत, सुरेखा सुनिल भगत यांचा समावेश होता. याप्रमाणेच मुरबाड तालुक्यातील कळंभाड येथील मनिषा अनंता वाघ, नंदिनी अशोक शिंद, महिनषा तानाजी पादीर, उषा उत्तम पादीर, हिरा गुरूनाथ वाघ या महिलांचा समावेश. तर शहापूर तालुक्यातील लेनाडच्या तुळशीबाई भास्कर मेंगाळ, लक्ष्मीबाई लक्ष्मण धिडे तर शेलवलीच्या जानकी भगवान दिवा, वेहळोलीच्या दिपीका गुरूनाथ ठोंबरे आणि नंदा हरी धापटे आदी महिलांचा या ‘ठाणे जिल्हा ई गृहप्रवेश’ ’कार्यक्रमात समावेश होता.
-

Web Title: With the Prime Minister Narendra Modi, 22 women interacted with the Videoconferencing conference in Thane.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.