मतदान केंद्रांवर समस्यांची भरमार, शिक्षकांनी वाचला पाढा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:14 AM2019-05-07T02:14:14+5:302019-05-07T02:14:29+5:30
: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला.
ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रांवर ड्युटी बजावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना निवडणूक यंत्रणेच्या नियोजनशून्य कारभारामुळे असुविधांचा सामना करावा लागला. मुख्यत्वे महिला कर्मचाऱ्यांची यावेळी मोठी गैरसोय झाली. त्यामुळे निवडणूक यंत्रणेवर टीका करत, शिक्षकांनी त्यांना भेडसावलेल्या समस्यांचा पाढा सोमवारी पत्रकार परिषदेत वाचला.
महाराष्ट्र शिक्षक सेनेचे ठाणे महानगर अध्यक्ष गोकुळ पाटील यांनी महाराष्टÑ राज्य मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकांच्या समस्या मांडल्या. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक केंद्रांवर महिला कर्मचाºयांची मोठ्या प्रमाणात गौरसोय झाली. शिक्षक कर्मचाºयांना मतदानाच्या दिवशी नियुक्त्या देताना कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. किमान महिला शिक्षकांची सोय यंत्रणेने विचारात घेणे अपेक्षित होते; परंतु त्यांनाही घरापासून लांबच्या मतदान केंद्रांवर ड्युटी देण्यात आली होती. मतदान प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सर्व कामे आटोपून कर्मचाºयांना घरी जाण्यासाठी रात्री उशिर होत असतो. यावेळीही तसाच प्रकार झाल्याचे पाटील यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. आजचे युग हे डिजिटल युग आहे. असे असतानाही निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात कागदांचा वापर होत असतो. कागदांवर होणारा हा खर्च टाळावा, अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.
मतदानाच्या दिवशी काम करणाºया कर्मचाºयांचे मानधन कमी आहे. त्यात वाढ करावी करण्याची मागणी लावून धरण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. सरकारी कामात हलगर्जी झाल्यास संबंधित अधिकारी आणि कर्मचाºयावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येते; मात्र निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराकडे कोणी लक्ष देत नाही. त्यात कामाचा वाढत्या ताणामुळे अनेक कर्मचाºयांचे जीव जात असतात. याला सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी यावेळी केला. निवडणुकीचे काम करण्यासाठी शिक्षक सदैव तयार आहोत; पण मतदान केंद्रांवर होणाºया गौरसोयींची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घेऊन तेथे सोयी सुविधा पुरवण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे. असेच प्रकार भविष्यात सुरू राहिल्यास सर्व संघटना एकत्र येवून निवडणुकीचे काम न करण्याचा निर्णय घेतील, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.
बोटं निघाली सोलून
मतदारांच्या बोटावर शाई लावताना ती कर्मचाºयांच्या बोटालाही लागल्याने, त्यांच्या बोटांची सालपटं निघाल्याच्या तक्रारी महिला शिक्षकांनी काही वृत्तवाहिन्यांनी बोलताना केल्या. मतदान केंद्रांवर मतदारांच्या बोटावर शाई लावण्याचे काम दिवसभर सुरू असते. बरेचदा गडबडीत कर्मचाºयांच्या बोटांनाही शाई लागते. ही शाई रसायनयुक्त असल्याने कर्मचाºयांची बोट अक्षरश: सोलून निघाली आहेत.
अनेकांच्या बोटांची जळजळ होत आहे. पुढील निवडणुकीत आयोगाने चांगल्या प्रतीची शाई मागवावी, अशी मागणीही या शिक्षिकांनी केली.