सायकलच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार करणे ही काळाची गरज -राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2018 12:26 PM2018-01-28T12:26:50+5:302018-01-28T12:27:04+5:30
सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले .
डोंबिवली: सायकलने आरोग्याची गुरुकिल्ली दिली आहे . याच सायकल च्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रचार आणि प्रसार करणे ही काळची गरज आहे असे प्रतिपादन बंदरे व विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत पार पडलेल्या पहिल्या वहिल्या सायकल मित्र संमेलनात केले .
येथील सावित्रीबाई फ़ुले कलामंदिरात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चार सत्रात पार पडणाऱ्या या संमेलनाचे उदघाटन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले . या वेळेस क्रीडा भारती संस्थेचे राज चौधरी, संमेलनाचे आयोजक कमलाकर क्षीरसागर , पदभनाभ गोखले, ऋषीकेश यादव ,डॉ सुनील पुणतांबेकर उपस्थित होते . क्रीडाभारती ,नॅशनल युथ ऑर्गनायझेशन ,आणि डोंबिवली सायकल क्लब यांनी या संमेलनाचे आयोजन केले आहे. चव्हाण पुढे म्हणाले सायकलीमधून वीज निर्मिती होते आणि त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते हे निश्चितच चांगली गोष्ट आहे . स्मार्ट सिटी अंतर्गत सायकल स्वारांसाठी विशेष प्लॅन आखला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले . लहानपणापासूनच सायकलशी नाते जडले. आमच्या वेळी भाड्याने सायकल घेण्याची पद्धत होती ,सायकल शिकताना एक वेगळाच आनंद मिळायचा . परंतु आजच्या घडीला सायकल चालवताना मुले सहसा दिसून येत नाही .डोंबिवली शहराने दर वेळेला नवीन उपक्रमाचा पायंडा घातला आहे .पहिले सायकल मित्र संमेलन हा त्याचाच एक भाग आहे असे चव्हाण म्हणाले.
आनंदासाठी खेळा हे ब्रीद वाक्य क्रीडा भारती चे असून अशी संमेलन जिल्हा स्तरावर झाली पाहिजेत .सायकल हा आनंद देणारा व्यायाम आहे . कॉपीपेस्ट च्या जमान्यात अशा प्रकारची संमेलन आयोजित करून नवनिर्मिती चे प्रयोग केले पाहिजेत .सायकल ही पर्यावरणाची गरज असून हीचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा असे आवाहन क्रीडा भारती चे महामंत्री राज चौधरी यांनी यावेळी केले . मुंबईत ज्या प्रमाणे दरवर्षी दुर्ग मित्र संमेलन आयोजित केले जाते . त्याच प्रमाणे डोंबिवलीत प्रतिवर्षी सायकल मित्र संमेलन होईल असे आयोजक कमलाकर क्षीरसागर यांनी सांगितले . चार सत्रात हे संमेलन पार पडणार असून राज्यातील विविध सायकल क्लब चे प्रतिनिधी आणि विक्रमवीर सायकलपटूंनी उपस्थित लावली आहे .