राज यांच्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवणाऱ्यास चोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 03:35 AM2018-09-21T03:35:23+5:302018-09-21T03:35:34+5:30
गणेशोत्सवाच्या काळात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवून राज यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणा-या एका तरुणाला मनसेच्या पदाधिका-यांनी माफी मागण्यास भाग पाडले.
बदलापूर : गणेशोत्सवाच्या काळात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवून राज यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणा-या एका तरुणाला मनसेच्या पदाधिका-यांनी माफी मागण्यास भाग पाडले. मनसेच्या महिला पदाधिकाºयांनी त्या तरुणाच्या कानाखाली वाजवली असून या प्रकारानंतर संबंधित तरुणाने सोशल मीडियावर माफीनामाही टाकला आहे. या तरुणास चोप देणाºया महिला पदाधिकाºयांचा जिल्हा शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला, हे विशेष.
गणेशोत्सवाच्या काळात राज ठाकरे यांचे एक व्यंगचित्र चांगलेच चर्चेत आले. भाजपाच्या विरोधातील या व्यंगचित्रावर बºयावाईट प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवर बदलापुरातील एका तरुणाने त्याचा विरोध नोंदवणारी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा विरोध त्या तरुणाला भलताच महागात पडला.
राज ठाकरेंना विरोध करणाºयाचा शोध घेण्याचे आदेश मनसेच्या जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात आले.
अंबरनाथ आणि बदलापुरातील मनसे कार्यकर्त्यांनी तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो बदलापुरातील रहिवासी निघाला. मनसेच्या पदाधिकाºयांनी शोध घेऊन त्याचा जाहीर माफीनामा लिहून घेतला. हा माफीनामा सोशल मीडियावर टाकण्यास त्याला भाग पाडले.
एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही. मनसेच्या महिला सेना पदाधिकारी संगीता चेंदवणकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला चांगलाच चोप दिला. भरीसभर, या प्रकारानंतर मनसेचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी महिला सेनेच्या पदाधिकाºयांचा सत्कारही
केला.
दरम्यान, ज्या तरुणाला मनसे पदाधिकाºयांनी दबाव टाकून माफीनामा देण्यास भाग पाडले आणि वरूनही चोपही दिला, त्याने कोणतीही तक्रार न केल्याने या प्रकरणाला पूर्णविराम लागल्याचे सध्यातरी दिसत आहे. या वादावर भाजपा पदाधिकाºयांनी तूर्तास कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.