राम गणेश गडकरी कट्टयामुळे कल्याणच्या सांस्कृतिक वैभवात पडणार भर - राजेंद्र देवळेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 04:38 PM2018-01-25T16:38:15+5:302018-01-25T16:39:11+5:30
कल्याण - कल्याणमध्ये सुरु झालेल्या राम गणेश गडकरी कट्ट्याद्वारे कल्याणच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार आहे असे मत केडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केले. याप्रसंगी प्रथमच कल्याण शहरात 6 हजार विद्यार्थी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन शिवसेनाप्रमुखांना आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली.
कल्याण डोंबिवली महापालिका व राम गणेश गडकरी कट्ट्यातर्फे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व भाषाप्रभु राम गणेश गडकरी स्मृतीशताब्दीनिमित्त प्रथमच ‘महापौर बाल चित्रकला’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला ६ हजार विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला होता. राम गणेश गडकरी कट्ट्याचे नुकतेच उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व राम गणेश गडकरी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम पार पडला.यावेळी महापौर राजेंद्र देवळेकर बोलत होते. माजी महापौर रमेश जाधव, शिक्षण समिती सभापती वैजंयती घोलप-गुजर, सभापती सुनंदा कोट, नगरसेवक सुधीर बासरे, श्रेयस समेळ, माजी नगरसेवक सचिन बासरे, राम गणेश गडकरी कट्ट्याचे तुषार राजे, मेघन गुप्ते, पुरु षोत्तम फडणीस, पुसामा शाळा संघटनेचे भरत मलिक, डोमॅनिक पॉल, डॉ. प्रा. विमुक्ता राजे, अनघा देवळेकर इत्यांदीसह अनेकजण उपस्थित होते.
देवळेकर यांनी सांगितले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जागतिक किर्तीचे व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रातून त्यांनी मारलेले फटकारे संस्मरणीय आहेत. शिवसेनाप्रमुखांना ६ हजार विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेतून आदरांजली अर्पण केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका अशा प्रकारचे अनेक उपक्र म राबविणार असल्याचे सांगितले.
कल्याणच्या काळा तलावावर झालेल्या महापौर बाल चित्रकला स्पर्धेसाठी सुमारे २२५ शाळांतील ६ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण काळा तलाव परिसराला भरदिवसा विविधरंगी स्वरु प आले होते. चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते करण्यात आले. तलावाच्या सभोवती सर्वच विद्यार्थी विद्यार्थी दिसत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून रंग भरत स्वच्छ कल्याण डोंबिवली स्मार्ट कल्याण डोंबिवली, व्यंगचित्रे व पाणी हे जीवन या विषयांवर चित्रे रेखाटली. या चित्रकला स्पर्धेसाठी सर्व भाषिक शाळा सहभागी झाल्या होत्या. कल्याण शहराच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी जमले होते. एका वाहिनीवरील गायन विजेता नचिकेत लेले याचा कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते नागरी सत्कार करण्यात आला. दशक्र ीया चित्रपटाचे कलाकार उपस्थित होते.
कल्याणमध्ये स्थापन झालेल्या राम गणेश गडकरी कट्ट्यामुळे कल्याणची ओळखही सांस्कृतिक नगरी म्हणून केली जाईल असे मत पत्रकार तुषार राजे यांनी व्यक्त केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांची स्मृतींशताब्दी साजरी करणारी कल्याण डोंबिवली महापालिका महाराष्ट्रातील एकमेव महापालिका आहे. पूर्वी विविध चित्रपट व मालिकांमध्ये कल्याण परिसरातील कलाकार अभावानेच दिसत असत. आता परिस्थिती बदलली आहे. गडकरी कट्ट्याच्या निर्मितीनंतर कल्याण शहरातही मालिकांचे चित्रीकरण सुरु होईल असा आशावाद राजे यांनी व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वास्तव्य कल्याणमध्ये होते. त्याप्रमाणेच भाषाप्रभु राम गणेश गडकरी सुट्टीमध्ये कल्याण शहरातील आपल्या नातेवाईकांकडे येत असल्याची माहिती राजे यांनी दिली.
नचिकेत लेले याने आपल्या यशात कल्याणकरांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. दिग्दर्शक व कलाकार अभिजित झुंझारराव यांनी गडकरी कट्ट्यामुळे सांस्कृतिक चळवळीला चालना मिळेल असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी चित्रपट कलाकार अनुश्री फडणीस हिने राम गणेश गडकरी यांच्या कवितांचे वाचन केले. डॉ. प्रा. विमुक्ता राजे यांनी राम गणेश गडकरी शेक्सपिअर ते मराठीचा अविलया याविषयावर संपूर्ण राम गणेश गडकरी उभे केले.
कल्याणमध्ये प्रथमच आयोजित केलेल्या या आगळयावेगळया कार्यक्र मासाठी विद्यार्थ्यांबरोबर रसिकांनीही भरभरु न प्रतिसाद दिला. या बाल चित्रकला स्पर्धेत शिवसैनिक अनिल गोवळकर यांनी शिवसेनाप्रमुखांचे तैलचित्र रेखाटले तर कोन गावातील आटगांव शाळेतील शिक्षक संतोष म्हात्रे यांनी बाळासाहेबांची आकर्षक रांगोळी काढली होती. सरस्वती विद्यामंदिरचा विद्यार्थी पृथ्वीराज पांढरे याने शिवसेनाप्रमुखांचे चित्र रेखाटले होते. कार्यक्र मासाठी नचिकेत लेले, दशक्र ीया चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक अभिजित झुंझारराव, कलाकार अनुश्री फडणीस, रसिका चव्हाण, सोनाली मगर, राहुल शिरसाट, पुसामाचे भरत मलिक, डोमॅनिक पॉल, लिब्रलचे सुरेश शेठ, गडकरी कट्ट्याचे मेघन गुप्ते, पुरु षोत्तम फडणीस, नरेंद्र राजे, आशिष किर्णक, राधिका गुप्ते, महापालिकेचे सचिव संजय जाधव, जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर, मुकणे, योगेश पष्टे, प्रसन्न कापसे इत्यांदीसह अनेकजण उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. वृंदा भुस्कुटे व प्रा. जितेंद्र भामरे यांनी केले.
या स्पर्धेत इयत्ता तिसरी ते सहावीच्या गटात प्रथम श्रीकला प्रमोदकुमार गोगो (एसआयए स्कूल), द्वितीय तनिष्का वाघ (आर्य गुरु कुल), तृतीय उर्मिला चौधरी (सिक्र ेड हार्ट स्कूल), उत्तेजनार्थ अर्पणा देवळेकर (होली क्र ोस स्कूल), धृर्वी पटेल (गुरु नानक स्कूल). आर्या धयार (श्री गजानन हायस्कूल), सय्यद निझामअली (उर्दू हायस्कूल) राधिका पुरोहित (ओमकार इंग्लिश स्कूल)यांनी मिळविला आहे.
इयत्ता सातवी ते नववीच्या गटात प्रथम यशश्री सोनावणे (के. सी. गांधी स्कूल), द्वितीय श्रेयसी दुर्वे (चंद्रकांत पाटकर विद्यालय), तृतीय आर्यन पटेल (गुरु नानक स्कूल), उत्तेजनार्थ सोनुकुमार दास (डेढिया स्कूल), निकिता थदाणी (सिक्र ेड हार्ट स्कूल). कोमल ओसवाल (महावीर जैन हायस्कूल), पार्थ नारखेडे (रितू मेमोरियल) किर्ती चौधरी (सेंट थॉमस स्कूल)यांनी मिळविला आहे.
फोटो आहे