डोंबिवलीत १२वीसह शालांत परिक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांना रिक्षा चालकांनी सहकार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 08:21 PM2018-02-21T20:21:37+5:302018-02-21T20:27:27+5:30
बारावीसह शालांत परिक्षा सुरु झाल्या असून जे विद्यार्थी आपल्या रिक्षेतून प्रवास करून परिक्षा केंद्रापर्यंत जाऊ इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांना सन्मान पूर्वक सहकार्य करावे,अशा कोणत्याही विद्यार्थी प्रवाशांना नाकारू नये व रिक्षाभाडे जास्त आकारू नये अथवा कोणत्याही प्रकारचा वादविवाद घालू नये. असे आवाहन डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा युनियनने केले.
डोंबिवली: बारावीसह शालांत परिक्षा सुरु झाल्या असून जे विद्यार्थी आपल्या रिक्षेतून प्रवास करून परिक्षा केंद्रापर्यंत जाऊ इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांना सन्मान पूर्वक सहकार्य करावे,अशा कोणत्याही विद्यार्थी प्रवाशांना नाकारू नये व रिक्षाभाडे जास्त आकारू नये अथवा कोणत्याही प्रकारचा वादविवाद घालू नये. असे आवाहन डोंबिवलीतील लालबावटा रिक्षा युनियनने केले.
गैरसमजूतीनी रिक्षाचालक व विद्यार्थी यांच्यात रिक्षाभाडे आकारणीवरून वादविवाद निर्माण झाल्यास,अशावेळी रिक्षा चालकाने त्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही रिक्षाभाडे घेऊ नये. त्या विद्यार्थ्यांचे रिक्षाभाडे लालबावटा रिक्षा युनयनने देण्याची तरतुद करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. अशा विद्यार्थ्यांचे रिक्षाभाडे, रिक्षा चालकांने युनियनच्या कार्यालयात येऊन आपले रिक्षाभाडे घेऊन जावे असेही संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर यांनी स्पष्ट केले. तसेच एकाद्या विद्यार्थ्याकडे पैसे नसतील किंवा पैसे कमी असतील किंवा आपली पर्स विसरले असतील तर अशा विद्यार्थ्यांना मोफत सोडण्यात यावे,अशा विद्यार्थ्यांचेही रिक्षाभाडे युनियन तर्फे देण्यात येईल असेही ते म्हणाले. बुधवारी दिवसभरात कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार आली नसल्याची माहिती कोमास्कर यांनी बुधवारी संध्याकाळी दिली.