रूफ टॉप हॉटेल, पबवर हातोडा, हुक्का पार्लरही तोडल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 06:36 AM2018-01-02T06:36:53+5:302018-01-02T06:37:02+5:30

मुंबईत रूफ टॉप पब आणि हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आपल्या हद्दीतील हॉटेल्स आणि बारविरोधात ठाणे पालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. दिवसभरात या मोहिमेत हॉटेल लेरिडा, वैशाली, रंगला पंजाब, रूड लाउंज आणि हॉटेल तुलसी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी उभारलेले अनधिकृत मंडप

 Roof Top Hotel, Pubar Hathoda, Hukka Parlor, too | रूफ टॉप हॉटेल, पबवर हातोडा, हुक्का पार्लरही तोडल  

रूफ टॉप हॉटेल, पबवर हातोडा, हुक्का पार्लरही तोडल  

Next

ठाणे : मुंबईत रूफ टॉप पब आणि हॉटेलला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर आपल्या हद्दीतील हॉटेल्स आणि बारविरोधात ठाणे पालिकेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतली. दिवसभरात या मोहिमेत हॉटेल लेरिडा, वैशाली, रंगला पंजाब, रूड लाउंज आणि हॉटेल तुलसी येथे नववर्षाच्या स्वागतासाठी उभारलेले अनधिकृत मंडप, रूफ टॉप पालिकेने जमीनदोस्त केले. दादलानी रोड येथील हवेली हुक्का पार्लर तोडले, तर जयेश बार व माजिवडा ब्रिजजवळील तृप्ती, शॉकसह ३९ हुक्का पार्लर सील केले. हिरानंदानी येथील मेडोज व बार इंडेक्स यांचे फर्निचर महापालिकेने जप्त केले.
शहरात थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येला ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जात असताना टेरेसवर उभारण्यात आलेले बार, हुक्का पार्लरवर महापालिकेच्या वतीने तोड कारवाई करण्यात आली आहे. ठाणे महापालिका अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले आणि अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे, सहायक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडक कारवाई केली.
शहरात अग्निसुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची हेळसांड केली जाणार नसून दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रभाग समितीस्तरावर अधिकाºयांची पथके तयार करून शहरातील अग्निसुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत.

गेल्या तीन दिवसांमध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयात तब्बल दोन हजार ९२८ मद्यपी वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. एकट्या ३१ डिसेंबरच्या रात्री १३६६ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून २८ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. नववर्षाचे स्वागत ठाणेकरांनी जल्लोषात केले. आनंदाच्या भरात वाहनधारक मद्यप्राशन करून वाहने चालवतात. त्यामुळे बºयाचदा भीषण अपघात घडतात. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी यंदा मद्यपी वाहनधारकांविरोधात कडक कारवाई केली.

वाहनधारकांमध्ये धाक निर्माण व्हावा, यासाठी दोन दिवस आधी म्हणजे २९ डिसेंबरपासून पोलिसांनी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. २९ डिसेंबर रोजी पोलिसांनी २०५ वाहनधारकांवर कारवाई करून तीन लाख ६४ हजार ९०० रुपये दंड वसूल केला. दुसºया दिवशी ३० डिसेंबर रोजी पोलिसांनी जोर वाढवून ३९६ वाहनधारकांवर कारवाई केली. त्यांच्याजवळून १० लाख ६६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

दोन दिवसांच्या कारवाईचा धाक वाहनधारकांमध्ये निर्माण होईल. परिणामी, ३१ डिसेंबर रोजी परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी होती. संपूर्ण पोलीस आयुक्तालयात ३१ डिसेंबरच्या रात्री तब्बल १३२७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४ लाख पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तीन दिवसांमध्ये एकूण १९२८ वाहनधारकांवर कारवाई केली असून त्यांच्याजवळून २८ लाख ३६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

या कारवाईमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ८० अधिकारी, ४५० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. मद्यपी वाहनधारकांची तपासणी करण्यासाठी ४३ ब्रीथ अनालायझर्स (श्वास तपासण्याचे यंत्र) वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते. शहरासह आयुक्तालयातील सर्व महत्त्वाच्या नाक्यांवर वाहतूक पोलीस आणि मोबाइल व्हॅन्स रात्रभर तैनात होत्या. ३१ डिसेंबर रोजी सर्वात जास्त कारवाया भिवंडीतील नारपोली येथे, तर सर्वात कमी कारवाया ठाणे शहरातील राबोडीच्या हद्दीत करण्यात आल्या.

Web Title:  Roof Top Hotel, Pubar Hathoda, Hukka Parlor, too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे