ग्रामीण विद्यार्थीही करणार अवकाश दर्शन
By admin | Published: May 3, 2017 05:30 AM2017-05-03T05:30:19+5:302017-05-03T05:30:19+5:30
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यातून चिकीत्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून इंडियन वुमेन
नरेश पाटील / लोनाड
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व त्यातून चिकीत्सक वृत्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा म्हणून इंडियन वुमेन अॅन्ड चिल्ड्रेन फाऊंडेशन ही संस्था अॅमेझॉन केअर्स सीएसआर प्रकल्पांतर्गत विविध उपक्र म राबवित आहे. या अंतर्गत कुरु ंद येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच सुसज्ज तारंगणाचे उद्घाटन झाले.
मागील वर्षी भाभा अणूसंशोधन केंद्रात विद्यार्थ्यांना विविध प्रयोग पाहण्याची संधी दिली. तर या वर्षी १८ शाळांमधील सुमारे १८०० विद्यार्थ्यांना नेहरू तारांगण व नेहरू विज्ञान केंद्र येथे प्रयोग दाखवण्यात आले. कुरूंद येथील आदर्श विद्यालय व आमणे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे दरमहा विज्ञान प्रयोगाचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन शिबिर घेण्यात येते. हे सर्व उपक्र म राबवल्यावर संस्थेच्या निदर्शनास आले की विद्यार्थ्यांचे खगोलाच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या नाहीत. प्रत्येक विद्यार्थी मुंबईला नेहरु तारांगणात जाऊन माहिती मिळवू शकत नाही .
हे सर्व लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या कुरूंद येथील शाळेत तारांगण तयार केले असून त्याचे उद्घाटन नुकतेच झाले. १५ बाय १० फुटाचा स्क्र ीन असलेल्या या तारांगणात एकावेळी २५ विद्यार्थी, शिक्षकांना प्रवेश देण्यात येईल. विविध खगोलीय घटना व माहिती त्रिमितीय चित्रफितीद्वारे दाखवण्यात येईल.
हे तारांगण विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी मोफत असणार आहे. प्रवेशाबाबतचे नियम,नोंदणीपद्धत व संपर्कक्र मांक लवकरच जाहीर करण्यात येतील. एखाद्या जिल्हा परिषद शाळेतील हे पहिलेच तारंगण असावे. यासाठी अॅमेझॉन केअर्स च्या सीएसआर लीड मनीषा पाटील व आयडब्ल्यूसीएफचे अध्यक्ष प्रभाकर जाधव यांचे सहकार्य मिळाले. संस्थेचे प्रोजेक्ट कोआॅर्डिनेटर सारिपुत्र साळवे व त्यांच्या पथकाने विशेष मेहनत घेऊन हे तारांगण तयार केले आहे. विविध देशातील मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.
वेळापत्रक मिळणार
शाळा सुरू होण्यापूर्वी वेळापत्रक मिळणार १५ जूनला शाळा सुरु होण्यापूर्वी वेळापत्रक व संपर्कक्र मांक जाहीर करण्यात येईल असे अध्यक्ष प्रभाकर जाधव, सचिव अलंकार वारघडे यांनी सांगितले.