संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास - येऊर जंगलातील वणव्यांना आळा घालण्यासाठी आता प्रशिक्षित आदिवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 07:53 PM2019-03-15T19:53:12+5:302019-03-15T19:57:05+5:30
या आदिवासींना प्रशिक्षित करण्यासाठी येऊर येथील उपवन कार्यालयाच्या परिक्षेत्र वन अधिका-यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय कावेसर येथील पाचवड पाडा येथील आदिवासींना वणव्यामुळे होणा:या नुकसानीसह जिवीत व वित्तआणीची जाणीव करून देण्यात आली,
ठाणो : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात या आधी ठिकठिकाणी वणवे लागून जंगल संपत्तीचे नुकसान झाले. वन्यप्राणी व जीवतंतूचा या वन्यामुळे जीव गेला. या वणव्याना आळा घालण्यासाठी आता या परिसरातील आदिवासींसह महिलाना प्रशिक्षिण देण्यात आले. या प्रशिक्षित आदिवासींकडून आता जंगलांचे संरक्षण केले जाणार आहे.
या आदिवासींना प्रशिक्षित करण्यासाठी येऊर येथील उपवन कार्यालयाच्या परिक्षेत्र वन अधिका-यांना खास प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय कावेसर येथील पाचवड पाडा येथील आदिवासींना वणव्यामुळे होणा:या नुकसानीसह जिवीत व वित्तआणीची जाणीव करून देण्यात आली, त्यांच्या या प्रबोधनव प्रशिक्षिण कार्यक्रमासाठी येऊर परीक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पावर परिमंडळ अधिकारी एस.एस.कोळी आदींसह वनकर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या प्रबोधनात्मक प्रशिक्षणासाठी सुमारे 80 आदिवासी स्त्री - पुरूषांची उपस्थिती असल्याचा दावा वन विभागाने केला. या येऊर परिसरातील जंगलातील वनव्याना आळा घालण्याच्या कार्यक्रमास सहभागी झालेल्या प्रशिक्षित आदिवासींना प्रत्येकी सुमारे 500 रूपये मानधनही देण्यात आले. या मानधनाचा लाभ येऊरच्या जंगलातील सुमारे 20 प्रशिक्षित आदिवासी परिवारास करून देण्यात आला आहे. यामुळे जंगलातील या जीव घेण्या वणव्यांना आता आळा बसण्याची अपेक्षा जोर धरू लागली आहे.
........