पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 04:46 PM2017-12-18T16:46:35+5:302017-12-18T16:48:24+5:30

येत्या जूनअखेर पर्यंत पारसिक चौपाटीचे स्वप्न साकार केले जाईल असे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. सोमवारी त्यांनी सुरु असलेल्या कामांचा पाहणी दौरा केला.

Sanjeev Jaiswal's assurance to complete the dream of Parasik Chowpatti till June | पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन

पारसिक चौपाटीचे स्वप्न जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांचे आश्वासन

Next
ठळक मुद्देपारसिक चौपाटीचे काम युध्द पातळीवरगावदेवी उद्यानाखाली पार्कींग सुविधा उपलब्ध करण्यासाठी चाचपणी

ठाणे - कळव्यातील पारसिक चौपाटी प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या जूनअखेरपर्यंत ठाणेकरांचे चौपाटीचे ऐतिहासिक स्वप्न पूर्ण होणार असल्याचे आश्वासन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहे. तसेच स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत पर्यायी व्यवस्था करण्याबाबत महापालिका पावले उतलण्यास सुरूवात झाली असून त्याबाबतही लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
                   सोमवारी सकाळपासून जवळपास ५ तास आयुक्तांनी विविध प्रकल्पांची, रस्त्यांची, पारसिक चौपाटी आणि स्टेशन परिसराची झाडाझडती घेतली. यावेळी स्टेशन येथे त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी १० वाजता महापालिका आयुक्तांनी घोडबंदर रोडपासून आपल्या पाहणी दौºयास सुरूवात केली. पोखरण रोड नं. ३, टिकुजिनी वाडी, ग्लॅडी अल्वारीस मार्ग, गांधीनगर चौक, पोखरण रोड नं. २ या रस्त्यांची पाहणी करून त्यांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश नगर अभियंता अनिल पाटील यांना दिले. त्याचवेळी त्यांनी गांधीनगर ते शिवाईनगर चौकपर्यंत सुरू असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाची पाहणी करून या सायकल ट्रॅकचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच व्होल्टास कंपनी येथील नाल्यावरील पूलाची रूंदी वाढविण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.
पोखरण रोड नं. २ पासून घाणेकर नाट्यगृहपर्यंत जाणाºया रस्त्याच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त करून या रस्त्यामध्ये येणारे प्रार्थना स्थळ स्थलातंरीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर आयुक्तांनी पारिसक चौपाटीच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच चौपाटीला जोडून तयार करण्यात येत असलेल्या सेवा रस्त्याच्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. येत्या जूनअखेरपर्यंत ठाणेकरांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी नगर अभियंता आणि संबंधित ठेकेदाराला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त संदीप माळवी, शहर विकाय व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, सुधीर गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्त (१) सुनील चव्हाण, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्यासह स्टेशन परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावदेवी मैदानातील भुयारी वाहन तळाबरोबरच गावदेवी उद्यानामध्येही भूयारी वाहनतळ सुरू करता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या तसेच गावदेवी मैदान येथे सायंकांळी ६ ते १० या वेळेत तात्पुरती पार्कींग व्यवस्था करता येईल का ही शक्यताही पडताळून पाहण्यास सांगितले. त्याचप्रमाणे स्टेशन परिसरातील रिक्षांसाठी पर्यायी मार्गिका काढता येवू शकते का याबाबतही पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.



 

Web Title: Sanjeev Jaiswal's assurance to complete the dream of Parasik Chowpatti till June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.