पुस्तक आदान प्रदान अभिनव उपक्रमाचे दुसरे वर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 06:11 PM2018-03-27T18:11:16+5:302018-03-27T18:11:16+5:30
पै फेण्ड्स लायब्ररी, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ, रोट्रॅक्ट क्लब आॅफ डोंबिवली मिडटाऊन युथ व डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने वाचन चळवळ जोमाने सुरू राहावी याकरिता पुस्तक आदान-प्रदान या अभिनव उपक्रमांचे सलग दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे.
डोंबिवली - पै फेण्ड्स लायब्ररी, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ, रोट्रॅक्ट क्लब आॅफ डोंबिवली मिडटाऊन युथ व डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार यांच्या सहकार्याने वाचन चळवळ जोमाने सुरू राहावी याकरिता पुस्तक आदान-प्रदान या अभिनव उपक्रमांचे सलग दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांसाठी ३१ मार्च पर्यंत आपल्याकडील पुस्तके लायब्ररीच्या कोणत्याही शाखेत नेऊन जमा करायची आहेत. वाचकांनी जास्तीत जास्त पुस्तके जमा करून आपल्या आवडीची इतर पुस्तके वाचण्यासाठी घेऊन जावीत असे आवाहन पै लायब्ररीचे पुडंलिक पै यांनी केले आहे.
संपूर्ण जगात जर्मन, फ्र ान्स, इटली व इग्लंड अश्या काही मोजकयाच देशात पुस्तके आदान प्रदान प्रदर्शन चालू असतात. त्यांना त्याठिकाणी उदंड प्रतिसाद ही लाभतो. या उपक्रमांमुळे वेगवेगळ््या विषयांवरील पुस्तकांचा संग्रह जमा होतो. हीच संकल्पना घेऊन डोंबिवलीतही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम ९ ते १५ एप्रिल या कालवधीत राबविला जाणार आहे. यंदाचे या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. या प्रदर्शनांसाठी वाचकांकडील मराठी व इंग्रजी भाषेतील, वाचकांनी वाचलेली, सुस्थितीत असलेली, मूळ प्रतच असलेली, वेळेनुसार जमा करायची आहे. यामध्ये कथासंग्रह, कादंबरी, चरित्र, ललितलेख संग्रह व अनुवादित पुस्तके स्विकारली जातील .वाचक त्यांच्या आवडीची कुठल्याही किंमतीची पुस्तके या प्रदर्शनात घेऊ शकतील. ही योजना सर्व डोंबिवलीकरांसाठी आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी लायब्ररीचे सभासद असण्याची अट नाही. या उपक्रमामुळे आवडीच्या व न वाचलेल्या पुस्तकांचा संग्रह वाचकांकडे जमा होईल.
९ ते १५ एप्रिल या कालवधीत साहित्यानंद कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत ९ एप्रिलला भारतीय वायुसेवा इतिहास आणि भविष्य यावर एअर मार्शल अरूण गरूड, १० एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कविता यावर धनश्री लेले, ११ एप्रिल रोजी तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड यावर अतुल कहाते, १२ एप्रिल रोजी बॅकींग- बुडीत कर्जांना जबाबदार कोण यावर उदय कर्वे, दिपक गोंधळेकर वाचकांशी संवाद साधणार आहेत. त्यांची मुलाखत स्नेहल दिक्षीत घेतील. १३ एप्रिल रोजी मायलेकी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यात पूर्वी भावे व वर्षा भावे सहभागी होणार आहेत. मधुरा ओक त्यांच्याशी संवाद साधतील. १४ एप्रिल रोजी एकवचनी या विषयावर संजय राऊत बोलणार आहेत. राजेंद्र हुंजे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. १५ एप्रिलला आरोग्याची गुरूकिल्ली यात डॉ. उल्हास कोल्हटकर, डॉ. महेश ठाकूर, डॉ. सुनिल खासबारदार सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी डॉ. अमृता वेलणकर संवाद साधतील . हे सर्व कार्यक्रम सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत टिळकनगर शाळेचे पेंढरकर सभागृहात होणार आहे. दररोज सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.