शिवाई वक्तृत्व स्पर्धा : शिवाई बालक मंदिर ट्रस्टचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 07:21 PM2017-11-22T19:21:22+5:302017-11-22T19:24:55+5:30
शिवाई बालक मंदिर ट्रस्टने यंदाही शिवाई वक्तृत्व स्पर्धा भरवली आहे. २४ व २५ नोव्हेंबर रोजी या स्पर्धा अनुक्रमे २४ नोव्हेंबर रोजी गट क्रमांक १च्या स्पर्धा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ व सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत व गट २ च्या स्पर्धा या २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्याच इमारतीमध्ये दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत भरवण्यात येणार आहेत. तेथे स्पर्धकांची प्राथमिक फेरी होणार आहे. कै. सीमा शशिकांत ठोसर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येते.
डोंबिवली: शिवाई बालक मंदिर ट्रस्टने यंदाही शिवाई वक्तृत्व स्पर्धा भरवली आहे. २४ व २५ नोव्हेंबर रोजी या स्पर्धा अनुक्रमे २४ नोव्हेंबर रोजी गट क्रमांक १च्या स्पर्धा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ व सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या कालावधीत व गट २ च्या स्पर्धा या २५ नोव्हेंबर रोजी शाळेच्याच इमारतीमध्ये दुपारी १.३० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत भरवण्यात येणार आहेत. तेथे स्पर्धकांची प्राथमिक फेरी होणार आहे. कै. सीमा शशिकांत ठोसर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येते.
प्राथमिक फेरीसाठी पहिल्या गटाला जीवनातील मित्राचे स्थान, समृद्ध भारत कसा घडेल, उपक्रमशील शिक्षणपद्धती हे विषय देण्यात आले आहेत. तर गट दोन साठी सरकारची अर्थविषयक बदलती धोरणे, भारतीय संस्कृती - बदलते स्वरुप, आजची तरुण पिढी व राष्ट्रीय एकात्मता हे विषय असतील असे आयोजकांनी जाहिर केले आहे.
प्राथमिक फेरीतून प्रथम येणा-या प्रत्येक पाच स्पर्धकांची अंतिम फेरी २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत मोरया सभागृह, आचार्य अत्रे ग्रंथालय, टिळक रोड, मदन ठाकरे चौक, डोंबिवली पूर्व येथे घेण्यात येणार आहे. पहिल्या गटातील अंतिम फेरीसाठी ‘डिजिटल इंडिया’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. तर दुस-या गटाच्या अंतिम फेरीसाठी ‘आजच्या युवा पिढीची संवेदनशिलता’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे.