ठाण्याच्या गोखले रोडवरील दुकानदारांनी मोटरसायकल बॅटरी चोरास रंगेहात पकडले
By सुरेश लोखंडे | Published: January 21, 2018 02:44 PM2018-01-21T14:44:34+5:302018-01-21T14:50:38+5:30
एकाने मानगुटी पकडून त्यांची बँग हिसकवून चाचपणी केली असता त्यात दोन मोटारसायकलच्या बॅट-या आढळून आल्या. उभ्या उभ्या बॅटरी काढून त्यांची चोरी करण्याचा त्याचा हातखंड असल्याचे प्रत्यक्ष दर्शींच्या निदर्शनात आले आणि त्यास चांगलेच धारेवर धरले.
ठाणे : उभ्या केलेल्या मोटरसायकलच्या बॅटरी चोरास नौपाड्याच्या गोखले रोडवरील दुकानदारांनी रविवारी रंगेहात पकडले. यावेळी त्यांच्या बँगेत चोरलेल्या दोन बॅट-यांसह त्याचे कपडे आढळून आले. यामुळे रस्त्या लगत उभ्या मोटरसायकलच्या बॅट-यां काढून त्यांची चोरी तो करीत असल्याचे निदर्शनात आले.
गोखले रोडवरील कला निकेतन या दुकानाच्या परिसरात उभ्या असलेल्या मोटरसायकलची टेहळणी करताना एक २२ वर्षीय तरूण आढळून आला. मोटारसायकल जवळ ब-याच वेळेपासून उभा असलेल्या या तरूणाच्या हालचाली काचेतून दुकानदार महिलेने न्याहाळल्या. त्या संशयास्पद दिसून येत असल्यामुळे त्यांनी सहका-याच्या निदर्शनात आणून दिल्या. त्यानंतर जवळ जाऊन त्याची विचारपूस करताच तो दचकला आणि जाण्याच्या तयारी होता. एवढयात एकाने मानगुटी पकडून त्यांची बँग हिसकवून चाचपणी केली असता त्यात दोन मोटारसायकलच्या बॅट-या आढळून आल्या. उभ्या उभ्या बॅटरी काढून त्यांची चोरी करण्याचा त्याचा हातखंड असल्याचे प्रत्यक्ष दर्शींच्या निदर्शनात आले आणि त्यास चांगलेच धारेवर धरले.
या बॅट-या कोणत्या गाड्यांच्या काढल्या, अशी विचारणा त्यास केली असता येथील गाड्यांच्या नसून दुस-या ठिकाणाहून त्या आणल्याची कबुली त्याने दिली. यावेळी जमलेल्यापैकी बहुतेक जण त्याला नौपाडा पोलिसात देण्याची अपेक्षा व्यक्त करीत होता. दरम्यान त्याची विचारपासून सुरू असताना नाहक मनस्ताप नको म्हणून काही जण त्यास सोडून देण्या विषयी चर्चा करीत असल्याचे आढळून आले. दरम्यान त्यास सोडून दिल्याचे प्रत्यक्ष दर्शींकडून सांगण्यात आले. त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले असते तर अन्य ठिकाणच्या चोरी विषयी दागेदोरेद सापडले असते, असे काही जणांकडून ऐकायला मिळाले.
........