पालिकेच्या चेंबरमध्ये शॉर्टसर्किट
By admin | Published: August 28, 2015 02:15 AM2015-08-28T02:15:39+5:302015-08-28T02:15:39+5:30
पालिका मुख्यालय परिसरातील एका चेंबरमधून गेलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने संपूर्ण मुख्यालयात अंधार पसरला. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास घडली.
भार्इंदर : पालिका मुख्यालय परिसरातील एका चेंबरमधून गेलेल्या केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने संपूर्ण मुख्यालयात अंधार पसरला. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास घडली. हे सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास येताच त्याने त्वरित अग्निशमन दलाला पाचारण केल्याने संभाव्य दुर्घटना टळली.
पालिका मुख्यालय परिसरात असलेल्या मलवाहिनीच्या चेंबरमधून वीजपुरवठा करणारी केबल गेल्याचे वरील घटनेमुळे उघडकीस आले. या घटनेमुळे मुख्यालय अंधारात गेले असले तरी विजेची पर्यायी व्यवस्था म्हणून बसविलेले जनरेटरदेखील सुरक्षितता म्हणून बंद ठेवले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह या विभागाचे अधिकारी व विविध पक्षांच्या नगरसेवकांनी तेथे धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही केबल त्वरित तोडली. तसेच मुख्यालय इमारतीवरून गेलेल्या केबल्सजवळ वाढलेली झाडेसुद्धा छाटली. दुर्लक्ष झाले असते तर संगणक विभागाला फटका बसला असता. मुख्य कागदपत्रांसह मालमत्ताकर, जन्म-मृत्यू दाखला आदी महत्त्वाच्या बाबींची नोंद केली जाते. तसेच या ठिकाणी पार्किंग करण्यात येत असून येथून कर्मचारी व नागरिकांची सतत वर्दळ असते. या केबल त्वरित इतरत्र हलविण्याच्या सूचना वरिष्ठांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. (प्रतिनिधी)