वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात श्रेयस सनगरे तर कनिष्ठ गटात दर्शन गायकवाड प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 04:21 PM2018-09-15T16:21:02+5:302018-09-15T16:29:26+5:30
ठाण्यातील सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात वक्तृत्वाचा महायज्ञ पार पडला.
ठाणे: ठाण्यातील सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आयोजित कै. ग. का. फणसे व कै. इंदिराबाई फणसे कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटात माटुंग्यातील रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या श्रेयस सनगरे तर कनिष्ठ गटात माटुंग्यातील डी.जी. रुपारेल महाविद्यालयाच्या दर्शन गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वरिष्ठ गटातून श्रेयस सनगरे तर कनिष्ठ गटातून नेरळ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अनिकेत चाळके याने पटकावले. स्पर्धेचे यंदाचे हे १६ वे वर्ष होते. या स्पर्धेत वरिष्ठ गटात ४९ तर कनिष्ठ गटात ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. वरिष्ठ गटासाठी विश्वास कणेकर आणि नरेंद्र बेडेकर तर कनिष्ठ गटासाठी मकरंद जोशी आणि धनश्री करमरकर यांनी परिक्षण केले. वरिष्ठ गटात एकनाथ गोपाळ (जोशी - बेडेकर महाविद्यालय) याने दुसरा, प्रणाली बोरकर (बी. एन. महाविद्यालय, ठाणे) हिने तिसरा तर उद्धव ठाकरे (ल.दे. सोनावणे महाविद्यालय), क्षितिजा पानस्कर (जोशी - बेडेकर महाविद्यालय), दर्शना उपार (स.प्र. ज्ञानसाधना महाविद्यालय), प्रचिती परब (रुपारेल महाविद्यालय), धनंजय आंबेकर (भवन्स महाविद्यालय) यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावली. कनिष्ठ गटात स.प्र. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अंजली अडावकर हिने दुसरा तर इशिता दळवी हिने तिसरा क्रमांक पटकावला. तसेच, मैत्रेयी भारती (मो.ह. कनिष्ठ महाविद्यालय), अनिकेत खोत (अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय), रोहन धोंडे (एस.आई. ई. एस. महाविद्यालय)स अमन सरगर (व्ही.जे.टी.आय), अनिकेत चाळके (नेरळ विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. यावेळी प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वाती नाझर, पर्यवेक्षिका प्रा. प्रज्ञा कानविंदे, स्पर्धा समिती सचिव प्रा. प्रदिप ढवळ, समीर फणसे आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या नियोजनात वरिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धा प्रमुख डॉ. प्रज्ञा पवार व कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्पर्धा प्रमुख डॉ. वंदना शिंदे तसेच, प्रा. साधना गोरे, प्रा. मनिषा राजपूत, प्रा. हरेश्वर भोये, प्रा. रुपेश महाडीक, प्रा. महेश कुलसंगे, प्रा. दिलीप वसावे, प्रा. किशोर वानखेडे आदी सहभागी होते.