ठाण्यातील ३०६ नाल्यांच्या सफाईला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:33 AM2018-05-09T06:33:32+5:302018-05-09T06:33:32+5:30
ठाण्यात नालेसफाईला मंगळवारपासून सुरु वात केली असून यावेळी ५८ कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी ती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कामासाठी १० कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. यावर्षी केवळ ८ कोटींचा निधी देण्यात आला आहे.
ठाणे : ठाण्यात नालेसफाईला मंगळवारपासून सुरु वात केली असून यावेळी ५८ कंत्राटदारांच्या माध्यमातून शहरात एकाच वेळी ती करण्यात येत आहे. गेल्या वर्षी या कामासाठी १० कोटींचा निधी प्रस्तावित केला होता. यावर्षी केवळ ८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. छोट्या नाल्यांच्या सफाईचा मोठ्या नालेसफाईच्या कामांमध्ये समावेश केल्याने यावर्षी ठेकेदारांची संख्या कमी झाली आहे. यावर्षी छोट्या गटारांच्या सफाईकडेदेखील लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली आहे.
शहरात दरवर्षी नालेसफाईच्या कामाला उशिराने सुरु वात होत असली तरी यावर्षी मात्र नालेसफाईची कामे वेळेवर सुरू झाली आहेत. ३० मे पर्यंत ती संपवण्याची डेडलाईन असून ३१ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरात ११९ किमीचे ३०६ नाले असून यामध्ये १३ नाले हे मोठे आहेत. प्रभाग समितीनिहाय नालेसफाईच्या कामाचे नियोजन केले असून या कामांसाठी गेल्यावर्षी ६५ ठेकेदारांची नियुक्ती केली असली तर यावर्षी ठेकेदारांची संख्या कमी केली आहे. गुढी पाडव्यापासून प्लास्टिक बंदी केल्याने आता यावर्षी नाले तुंबण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, याचा परिणाम पुढच्या नालेसफाईमध्ये दिसेल असेही या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नालेसफाई करताना विशेष करून डोंगरावरून वाहत येणाºया नाल्याची मुख्य समस्या असल्याने यावर्षी अशा नाल्यांवरदेखील विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे या विभागाने स्पष्ट केले आहे. रेल्वेच्या बाजूला असलेले कल्व्हर्टदेखील महापालिकेच्या माध्यमातून साफ करण्यात येत असल्याने यासाठी विशेष निधी प्रस्तावित केला आहे.
सफाई वेळेत पूर्ण होणार
यावर्षी नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण होणार असून नाल्यांमधून काढण्यात येणाºया गाळदेखील विशेष दक्षता घेऊन मोजला जाणार आहे.
नालेसफाई झाल्यापासून ते आॅक्टोबरपर्यंत या सर्व नाल्यांची देखभाल त्या त्या कंत्रादारांना करावी लागणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.