नवीन वरसावे पुलाचे काम लवकर सुरु करा अन्यथा जनआंदोलन छेडू; कामगार सेनेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 04:42 PM2018-02-09T16:42:17+5:302018-02-09T16:43:41+5:30

मीरा-भार्इंदर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील नियोजित वरसावे पुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतच्या ठाणे पुरवणीत ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या मीरा-भार्इंदर कामगार सेनेचे सरचिटणीस सुल्तान पटेल यांनी त्या पुलाच्या बांधकामातील अडचणी त्वरीत दूर करुन त्याचे काम सुरु करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिला आहे.

Start the work of the new Versa bridge or else the movement will be started; Warning to the National Workers' Association National Highway Authority | नवीन वरसावे पुलाचे काम लवकर सुरु करा अन्यथा जनआंदोलन छेडू; कामगार सेनेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा

नवीन वरसावे पुलाचे काम लवकर सुरु करा अन्यथा जनआंदोलन छेडू; कामगार सेनेचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला इशारा

Next

भार्इंदर :  मीरा-भार्इंदर शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ वरील नियोजित वरसावे पुलाच्या बांधकामात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतच्या ठाणे पुरवणीत ८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होताच शिवसेनेच्या मीरा-भार्इंदर कामगार सेनेचे सरचिटणीस सुल्तान पटेल यांनी त्या पुलाच्या बांधकामातील अडचणी त्वरीत दूर करुन त्याचे काम सुरु करावे अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू असा इशारा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) दिला आहे.

मीरा-भार्इंदर शहराचा विकास झपाट्याने होत असुन शहरातील वाहने देखील सतत वाढत आहे. येथील नागरीकांना ठाणे अथवा वसई-विरारला रस्ते वाहतुकी मार्गे जायचे झाल्यास प्रचंड वाहतुक कोंडीतून मार्ग काढावा लागतो. शहरातील नागरीकांना वसई-विरारसह ठाणे येथे जाण्यासाठी महामार्गाचाच एकमेव आधार असल्याने या महामार्गावर सध्या वाहतुक कोंडी नित्याची झाली आहे. त्यातच या मार्गावरील वरसावे येथील उल्हासनदीवर ४५ वर्षांपुर्वी बांधलेला वाहतुक पुल सतत नादुरुस्त होऊ लागल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागला आहे. त्याच्या लगत असलेल्यान पुलावरही वाहनांची मोठी वर्दळ असल्याने त्यात अवजड वाहनांचा मोठा भरणा असतो. या पुलांच्या एका बाजुस वरसावे व दुसय््राा बाजुस ससुनवघर हि गावे असल्याने तेथील नागरीकांना पुलावरून ये-जा करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. रात्रीच्या वेळेस तर पुलावर पथदिवे नसल्याने पादचाऱ्यांची मोठी कोंडी होते. या पुलावरुन ठाणे, मुंबईसह उपनगरांमधील हजारो वाहने दररोज ये-जा करीत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजुंस वाहतुक कोंडीत भर पडत आहे. त्याला पर्याय म्हणुन एनएचएआयने नवीन वाहतुक पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला असुन त्याचे कंत्राट विजय मेस्त्री कंस्ट्रक्शन अ‍ॅन्ड एनजी प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीला काही महिन्यांपुर्वीच दिले आहे. मात्र त्याचे भूमीपुजन ११ डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात आले असुन कामाचा कार्यादेशच अद्याप कंपनीला न दिल्याने पुलाचे बांधकाम सुरु झालेले नाही. परिणामी या पुलाचे बांधकामच विविध सरकारी परवानग्यांत अडकल्याने कंपनीने एनएचएआयवर ३० कोटींचा नुकसान भरपाईची नोटीस बजावली आहे. त्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच नियोजित वाहतुक पुलाची कोंडी होऊन सध्याची वाहतुक कोंडी कायम राहण्याचे संकेत मिळू लागल्याने एनएचएआयला पटेल यांनी नियोजित वाहतुक पुलाची निर्मिती लवकरात लवकर होणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर २४ महिन्यांतील पुलाचे बांधकाम १८ महिन्यांत पुर्ण करण्याचा वादा केला आहे. परंतु, पुलाचे बांधकामच तांत्रिक अडचणीत सापडल्याने पुलाच्या बांधकामाला मोठा विलंब होण्याची शक्यता पटेल यांनी वर्तविली आहे. त्या अडचणी एनएचएआयने त्वरीत निकाली न काढल्यास तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

Web Title: Start the work of the new Versa bridge or else the movement will be started; Warning to the National Workers' Association National Highway Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.