"मनातल्या गोष्टी" व "वासुदेवाय नमः" एकांकिका कट्ट्यावर सादर:प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 04:05 PM2018-08-06T16:05:31+5:302018-08-06T16:07:59+5:30
गेली अनेक वर्ष सातत्याने वेगवेगळे नाट्य प्रयोग करणाऱ्या अभिनय कट्ट्यावर एकांकिका पाहण्यासाठी रसिकांची गर्दी झाली होती.
ठाणे : अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी "मनातल्या गोष्टी" हि विनोदी एकांकिका आणि अमर हिंद मंडळ,दादर या संस्थेने "वासुदेवाय नमः" हि एकांकिका सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.यंदाचा हा ३८८ क्रमांकाचा कट्टा होता.
तारुण्य हा आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ असतो.मैत्री करण्याचा,प्रेम करण्याचा,प्रेमात हरवण्याचा,मैत्रीसाठी वाट्टेल ते करण्याचा स्वतःची झालेली फजिती.तसेच मैत्रीच्या निरनिराळ्या गोष्टी,परिस्तिथी मूळे असफल झालेले प्रेम या एकांकिकेत लेखक,दिग्दर्शक अभिषेक जाधव याने मांडले.न्यूतन लंके,साक्षी महाडिक,कल्पेश डुकरे,शुभांगी गजरे,परेश दळवी,अभिषेक जाधव,सहदेव साळकर,शिवाणी देशमुख या कलाकरांनी या एकांकिकेत काम केले.ओंकार मराठे याने प्रकाशयोजना,सहदेव कोळंबकर याने संगीत केले होते. वासुदेवाय नमः हि एकांकिका वासुदेवाच्या आयुष्यावर भाष्य करणारी एकांकिका आहे.वासुदेवाच्या परंपरेवर समाजात कमी होत चाललेले स्थान.आणि हि परंपरा जपताना वासुदेवांचे होणारे हाल व डगमगलेली आर्थिक स्थिती आपल्याला पाहायला मिळते.यातूनच मुलांचे दुरावलेले शिक्षण आणि आणि आलेले आर्थिक दारिद्र्य आपल्याला या एकांकिकेत पाहायला मिळते. या एकांकिकेचे लेखन डॉ.माणिक वड्याळकार,दिगदर्शन गिरिष पांडे यांनी केले होते.प्रकाशयोजना संजय तोडणकर,संगीत समीर चव्हाण,नेपथ्य अमित सोळंकी यांनी केले होते.अश्वजीत फुले,अमित सोलंकी, ऐश्वर्या सक्रे,शुभम हिंदळेकर,विवेक बुरुंगुले,राहूल शिंदे,अभिषेक शेट्ये,आदित्य आंब्रे,गणेश गवारी,दानेश पाटील,मोहन आदलिंगे,हिमांशू वाईचोळ या काळाकरांनी या एकांकिकेत काम केले. या वेळी कट्ट्याचे निवेदन कदिर शेख याने केले.दीपप्रज्वलन शिला गोंधळेकर यांनी केले. एकांकिका या फक्त स्पर्धेपूरत्याच मर्यादित न राहता सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत त्या पोहचाव्यात या हेतूनेच आम्ही अभिनय कट्टा हि संकल्पना सुरु केली आहे.दिवसागणिक याचे वाढत जाणारे स्वरूप हि आनंदाची बाब आहे असे आयोजक किरण नाकती यांनी सांगितले.