ठाणे महापालिकेच्या २४० घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 02:40 PM2018-02-22T14:40:59+5:302018-02-22T14:42:56+5:30

ठाणे महापालिकेच्या घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून विविध मांगण्यासाठी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे शहरातील वर्तकनगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत एकही गाडी फिरकू शकलेली नाही.

Thane Municipal Work Stop Stop Work of 240 Gram Gadi Workers | ठाणे महापालिकेच्या २४० घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन

ठाणे महापालिकेच्या २४० घंटागाडी कामगारांचे काम बंद आंदोलन

Next
ठळक मुद्देठेकेदाराकडून अरेरावी, कामगारांचा आरोप२४० घंटागाडी कामगार काम बंद आंदोलनात सहभागी

ठाणे - विविध प्रकारची थकबाकी, पुढील तीन वर्षाच्या कपड्यांचे आधीच पैसे कापणे, तीन महिन्यापासून सुरु असलेली पगारात यासह विविध मागण्यांसाठी आणि ठेकेदाराच्या अरेरावीच्या विरोधात २४० घंटागाडी कामगारांनी गुरुवारी सकाळ पासून अचानकपणे काम बंद आंदोलन केले. जो पर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे.
           गुरुवारी सकाळी वर्तक नगर, वागळे आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत एकही घंटा गाडी फिरकली नाही. त्यामुळे या भागातील नागरीकांना घंटा गाडी न येण्याचा मुद्दाच समजू शकला नाही. प्रत्यक्षात या भागात फिरणाºया २४० घटांगाडीवरील कामगारांनी गुरवारी सकाळ पासूनच अचानक काम बंद आंदोलन पुकारले आहे. ठेकेदार एम. कुमार याच्या अरेरावीचा विरोध करीत या कामगारांनी गुरुवारी एकही गाडी बाहेर काढली नाही. या कामागारांच्या म्हणन्यानुसार २०१८-१९ आणि २० या तीन वर्षाचे ठेकेदाराने कपड्यांचे पैसे आधीच कापूण घेतले आहे. नियमानुसार ते चुकीचे असून या तीन वर्षाचे कपडे देखील त्याने आगाऊ घ्यावेत अशी नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षाचे पैसे कापूनही हाती पडलेले कपडे केवळ आठ दिवसातच खराब झाले असून त्यांचा दर्जा देखील खालचा आहे. त्यातही तीन वर्षाचे पैसे कापले हे जरी मान्य केले तरी देखील २०१७ मधील देखील पैसे आता का कापले असा सवाल या कामगारांनी उपस्थित केला आहे. मागील कित्येक वर्षापासूनची थकबाकी अद्यापही देण्यात आलेली नाही, पगार तारखेला होत नाहीत, कमी पगार दिला जातो, काही कामगार कामावर असून सुध्दा त्यांना कामावर नसल्याचे सांगून त्यांना पगारापासून वंचित ठेवले जात आहे. मागील तीन महिन्यापासून ७ हजार २०० रुपये पगारातून कापले जात आहेत, ते कशासाठी कापले जात आहेत, याचे उत्तर देखील मिळत नाही. याबाबत ठेकेदाराकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे.


 

Web Title: Thane Municipal Work Stop Stop Work of 240 Gram Gadi Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.