ठाणे-पालघरच्या २४ हजार शेतकऱ्यांना ७३ कोटींचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:38 AM2018-06-29T02:38:53+5:302018-06-29T02:38:55+5:30
यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे.
ठाणे : यंदाच्या खरीपातील पीककर्जासाठी १८० कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) आतापर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील सुमारे २४ हजार ३६३ शेतकºयांना ७२ कोटी ७८ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. शेतकºयांनी या कर्जाचा लाभ मोठ्याप्रमाणात घ्यावा, यासाठी सुमारे नऊ दिवस दोन्ही जिल्ह्यात शेतकºयांचे मेळावे आयोजित करून जनजागृती केली जात आहे. यानुसार शहापूर तालुक्यातील किन्हवली येथे गुरूवारी पहिला मेळावा घेतल्याचे टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
ठाणे व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी ९० कोटींचे पीककर्ज वाटप शेतकºयांना होणार आहे. यापैकी आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात ४३ कोटी २२ लाखांच्या पीककर्जाचा लाभ सुमारे १६ हजार ४६ शेतकºयांना मिळाला आहे. सुमारे ४८ टक्के कर्ज वाटप झालेल्या शेतकºयांमध्ये नियमित कर्ज भरणाºया नऊ हजार ३३२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना १२ कोटी ८९ लाखांचे कर्ज मिळाले आहे. तर कर्जमाफी मिळालेल्या सहा हजार ७१४ शेतकºयांना ३० कोटी ३३ लाखांच्या कर्जाचा लाभ झाला आहे. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यात तीन हजार ४४५ कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना २० कोटी ६८ लाखांचे पीक कर्ज मिळाले आहे. तर नियमित कर्ज भरणाºया चार हजार ८७२ शेतकºयांना आठ कोटी ८८ लाखांचे पीक कर्ज वाटप केल्याचा दावा टीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) भगीरथ भोईर यांनी केला आहे.
२९ जूनला वसईच्या शिरसाडफाटा येथील जैन मंदिर व पालघरच्या काँग्रेस भवन सभागृहात शेतकरी मेळावा आयोजिला आहे. तर ३० जूनला विक्रमगडचे श्री औसरकर सभागृह व डहाणू तालुक्यातील कासा येथील बँकेच्या सभागृहात मेळावा होणार आहे. यानंतर २ जुलैला मुरबाड बाजार समिती, ३ जुलैला भिवंडीच्या दुगाडफाटा येथील सत्संग सभागृह, ४ ला जव्हार - मोखाड्यासाठी जव्हारच्या बँक शाखा सभागृहात व ६ ला कल्याणच्या नालिंदीगांव भिसोळे येथे मेळावा आहे. याशिवाय ७ जुलैला तलासरीच्या आमगांव ग्रा.पं.मध्ये, ९ जुलैला अंबरनाथच्या बेलवली बँक शाखेत व ठाणेच्या कल्याण शीळफाटा दत्त मंदिर सभागृहात शेतकरी मेळावा आहे.