पोलिसांनी दुर्मिळ खवले मांजरची तस्करी ठाण्यात उधळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:05 PM2018-02-23T18:05:03+5:302018-02-23T18:05:03+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेला, अतिशय दुर्मिळ खवले मांजरची तस्करी करणार्‍या रायगड जिल्ह्यातील दोघांना ठाण्यातील वागळे इस्टेट गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी अटक केली. या प्राण्याची ते ४0 लाख रुपयात विक्री करणार होते.

Thane police arrested two poachers with Pangolin in Thane | पोलिसांनी दुर्मिळ खवले मांजरची तस्करी ठाण्यात उधळली

पोलिसांनी दुर्मिळ खवले मांजरची तस्करी ठाण्यात उधळली

Next
ठळक मुद्दे४0 लाख रुपयात करणार होते विक्रीरायगड जिल्ह्यातील दोघांना अटकदेखभालीसाठी वनविभागाच्या हवाली

ठाणे : अतिशय दुर्मिळ खवले मांजरची तस्करी करणार्‍या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट ५ ने शुक्रवारी अटक केली. नामशेष होत चाललेल्या या सस्तन प्राण्याची त्यांच्या तावडीतून पोलिसांची सुटका केली.
मुंग्या आणि अळ्या खाऊन जगणार्‍या खवले मांजरच्या तस्करीची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना दिल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी सापळा रचण्यात आला. त्यानंतर वागळे इस्टेटमधील श्रीनगर येथील आयप्पा मंदिराजवळ पोलिसांनी एक वाहन अडवले. या वाहनाची तपासणी सुरू असताना गाडीच्या मागच्या बाजुला एका पिंजर्‍यामध्ये खवले मांजर पोलिसांना आढळले. पोलिसांनी याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील अशोक जयराम जाधव आणि पोलादपूर येथील संतोष मुळजी बुटाला यांना अटक केली.
खवले मांजर हा संरक्षित वन्यजीव असल्याने श्रीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ४८, ४९, ५0 आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईची प्रक्रिया आटोपल्यानंतर देखभालीसाठी खवले मांजर वनविभागाच्या हवाली करण्यात आले. आरोपी हे मांजर ४0 लाख रुपयात विकणार होते. त्यासाठी ते ग्राहकाच्या शोधात होते. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केले.
कोकणातून पकडल्याची शक्यता
खवले मांजर हा एक दुर्मिळ, महागडा आणि प्रचंड मागणी असलेला प्राणी आहे. त्याचा वापर औषध तसेच अंमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. त्याच्या मांसालाही मोठी मागणी आहे. त्याचे खवले घरात शोभेसाठी वापरले जातात. आरोपी अशोक जाधव याने हे खवले मांजर स्वत: शिकार करून कोकणातून आणल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमि तपासली जात असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांनी सांगितले.

Web Title: Thane police arrested two poachers with Pangolin in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.