भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापा दोन दलालांसह खोलीमालकीणीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 10:58 PM2018-01-06T22:58:43+5:302018-01-06T23:05:58+5:30

Thane police raid on two-storey prostitution business | भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापा दोन दलालांसह खोलीमालकीणीस अटक

भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापा दोन दलालांसह खोलीमालकीणीस अटक

googlenewsNext
ठळक मुद्देदोन अल्पवयीन मुलींमार्फत वेश्या व्यवसाय सुरू होता.ठाण्याच्या मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेच्या पोलीसांनी केली कारवाईदोन अल्पवयीन पिडीत मुलींची रवानगी बालसुधारगृहात

भिवंडीत वेश्या व्यवसायावर ठाणे पोलीसांचा छापा
दोन दलालांसह खोलीमालकीणीस अटक
भिवंडी : शहरात संगमपाडा येथील खोलीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर ठाणे मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेच्या पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत व्यवसाय करवून घेणाºया दोन दलालांसह खोली मालकिणीस अटक करण्यात आली आहे.पोलीसांनी या त्रिकुटाच्या तावडीतून दोन अल्पवयीन पिडीत मुलींची सुटका केली आहे.
शहरातील संगमपाडा येथील एका चाळीतील खोलीची मालक सुनिता उर्फ सीमा परशुराम नाईक (३५) ही आपल्या खोलीत टेलरचा व्यवसाय करीत होती. तिच्याशी दलाल राजेशम रामलू आडेप ( ४१) व नाजिया अली अंसारी ( ४०)यांनी संपर्क करून तिची खोली वेश्या व्यवसायासाठी भाड्याने घेतली. त्यामध्ये तिघांंनी मिळून अवैधरित्या वेश्या व्यवसाय सुरू केला होता.त्यामुळे परिसरांतील लोकवस्तीतून विरोध होऊ लागला होता. या अनैतिक व्यवसायाची खबर ठाण्याच्या मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखेच्या पोलीसांना मिळाली.या शाखेमार्फत पोलीस पथक घटनास्थळी आले आणि त्यांनी खोली मालक सुनिता हिच्याशी बनावट ग्राहकामार्फत संपर्क केला. तेंव्हा सुनिताने बनावट ग्राहकास चार हजारात देहविक्रीसाठी मुलगी पुरविण्याचे ठरविले.त्यामुळे या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्याने पोलीस पथकाने काल रात्रीच्या सुमारास सुनिता नाईक हिच्या खोलीत छापा टाकून दोन अल्पवयीन मुलीची सुटका करीत मुली पुरविणारे दलाल राजेशम आडेप व नाजीया अली अन्सारी यांच्यासह सुनिता नाईक हिला देखील अटक केली. तर अल्पवयीन मुलींची या वेश्या व्यवसायातून सुटका केली. पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांनी निजामपुर पोलीस ठाण्यात तीघांवर गुन्हा दाखल केला असुन त्यांना आज शनिवारी दुपारी भिवंडी दिवाणी व फौजदारी न्यायालयांत हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तर या वेश्याव्यवसातून सुटका केलेल्या दोन अल्पवयीन पिडीत मुलींची रवानगी शहरातील कचेरीपाडा येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र या घटनेची खबर स्थानिक पोलीसांना नसल्याबद्दल नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Thane police raid on two-storey prostitution business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.