ठाणे मनोरुग्णालय : प्रभारी अधीक्षकपदासाठी भूलतज्ज्ञांमध्ये चढाओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:23 AM2017-12-11T06:23:10+5:302017-12-11T06:23:17+5:30

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील अधीक्षक डॉ. दिनकर रावखंडे यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत मनोरुग्णालयात चर्चेला उधाण आले आहे.

 Thane Psychiatric Surgery: In-charge In-charge for bureaucrats | ठाणे मनोरुग्णालय : प्रभारी अधीक्षकपदासाठी भूलतज्ज्ञांमध्ये चढाओढ

ठाणे मनोरुग्णालय : प्रभारी अधीक्षकपदासाठी भूलतज्ज्ञांमध्ये चढाओढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील अधीक्षक डॉ. दिनकर रावखंडे यांच्या सेवानिवृत्तीनंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत मनोरुग्णालयात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या पदावर प्रभारी म्हणून विराजमान होण्यासाठी रुग्णालयातील दोन भूलतज्ज्ञांमध्ये चढाओढ असल्याचे बोलले जात आहे.
वर्षभरापूर्वी डॉ. रावखंडे यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयातील अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. ३० डिसेंबर २०१७ रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या पदावर प्रभारी म्हणून विराजमान होण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी प्रादेशिक मनोरुग्णालयात रुजू झालेले डॉ. पाटील आणि गेल्या चार वर्षांपासून प्रादेशिक मनोरुग्णालयात कार्यरत असलेल्या उपअधीक्षक डॉ. उज्ज्वला गुट्टे-केंद्रे यांच्यात चुरस असल्याची चर्चा सुरू आहे.
याआधी मनोरुग्णालयाचा प्रभारी अधीक्षकपदाचा कारभार डॉ. विलास नलावडे, डॉ. राजेंद्र शिरसाट, डॉ. धोपटे यांनी सांभाळला होता. डॉ. शिरसाट यांची बदली झाल्यानंतर डॉ. रावखंडे रुजू होण्यापूर्वीच्या काळात या पदावर प्रभारी म्हणून विराजमान होण्यासाठी मनोरुग्णालयातील काही अनुभवी अधिकाºयांची धडपड सुरू होती. त्या वेळी डॉ. गुट्टे-केंद्रे यांनी हा प्रभारी अधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळला होता. मात्र, आता डॉ. रावखंडे यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांनाच पुन्हा संधी दिली जाते किंवा कसे, याबाबत औत्सुक्य आहे.
या पदावर प्रभारी म्हणून बसण्यासाठी डॉ. पाटील आणि डॉ. गुट्टे-केंद्रे या दोघांनाही इच्छा असल्याचे बोलले जाते. सेवाज्येष्ठतेनुसार डॉ. पाटील हे वरिष्ठ असले तरी डॉ. गुट्टे-केंद्रे यांनीही जवळपास चार वर्षे प्रादेशिक मनोरुग्णालयाचा उपअधीक्षकपदाचा कार्यभार सांभाळला असल्याने या ठिकाणच्या अडीअडचणींची त्यांना अधिक जाण आहे. याबाबत काय निर्णय होतो, ते लवकरच कळेल.

अधिकारीच होणार प्रभारी?

डॉ. गुट्टे-केंद्रे यांचा आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाºयासोबत संघर्ष आहे, त्यामुळे कदाचित डॉ. पाटील यांचे नाव उपसंचालक कार्यालयाकडून पुढे दामटले जाईल, अशी चर्चा आहे.

या प्रभारीपदावरील नियुक्तीवरून वाद होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या दोघांच्या चढाओढीत मनोरुग्णालयातील अन्य एखाद्या अधिकाºयाची प्रभारीपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title:  Thane Psychiatric Surgery: In-charge In-charge for bureaucrats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे