सुरांच्या मैफिलीने पार पडला ठाणे ग्रामीण पोलिसांचा दिवाळी स्रेहमेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 09:13 PM2018-11-16T21:13:42+5:302018-11-16T21:50:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : सण उत्सवांच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विरंगुळयाचे काही क्षण अनुभवता यावेत यासाठी ठाणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सण उत्सवांच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना विरंगुळयाचे काही क्षण अनुभवता यावेत यासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांच्या संकल्पनेतूल दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. हिंदी मराठी सिने कलाकारांच्या उपस्थितीमध्ये डॉ. राठोड यांनीही महंमद रफींची गाणी गाऊन पोेलीस कुटूंबियांची दाद मिळविली.
घोडबंदर रोडवरील ओवळा येथील ‘कोर्ट यार्ड’ हॉटेलच्या सभागृहात रंगलेल्या या बहारदार कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.कर्तव्याचा भाग म्हणून पोलीस दलावर गणपती, नवरात्रोत्सव आणि दिवाळी असे सलग व्यस्त बंदोबस्ताचे सण लागोपाठ येतात. त्यामुळेच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना कुटूंबांसमवेत असे सण साजरे करता येत नाहीत. याच पार्श्वभूमीवर ठाणे ग्रामीण पोलिसांसाठी दिवाळी स्रेहमिलन २०१८ या कार्यक्रमाचे १४ नोव्हेंबर रोजी रात्री आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ठाणे ग्रामीण पोलीस दलाची धुरा ज्यांच्या हाती आहे, त्या अधीक्षक डॉ. राठोड यांनी स्वत: रफींच्या आवाजातील गाणी गाऊन कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. ‘ओ मेरे मितवा’, ‘आनेसे उसके आये बहार’, ‘छुप गये सारे नजारे’ या गीतांबरोबरच ‘प्रितीचं झुळ झुळ पाणी’, ‘चोरीचा मामला’ या मराठी गाण्यांना प्रेक्षकांची त्यांना चांगलीच दाद मिळाली. या कार्यक्रमाला कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील तसेच ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटूंबीय यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सिने कलाकार मुकेश खन्ना, स्वप्नील जोशी, महिमा चौधरी, रविकिशन , मानसी नाईक तसेच ‘साज’ या आॅर्केस्ट्राच्या कलाकारांनी स्वर संगीताने दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम मंत्रमुग्ध केला.