ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर ९२ वर्षाच्या भाटेआजोबानी वाढवला उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:54 PM2019-05-04T15:54:27+5:302019-05-04T15:58:39+5:30
ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या किरण नाकती यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला संगीत कट्टा म्हणजे समस्त ठाणेकरांची पर्वणी ठरतोय .
ठाणे : गेल्या दोन वर्षात संगीत कट्ट्यावर विविध संगीतमय मैफिलींचा आस्वाद रसिकांना मिळतोय. ठाण्यातील जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर जेष्ठांची मैफिल रंगली व एकूण अठरा गायकांनी गाण्यांची उत्तम मेजवानी रसिकांना दिली.
ये शाम मस्तानी या शिर्षकाखाली या जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्याची सुरवात संदीप गुप्ता - फुलों को तारो का सबका कहना हे , या भावा बहिणीच्या नाते संबंधावर आधारित गाण्यानं झाली .नंतर दिलीप नारखडे - जिंदगी का सफर ,प्रवीण शाह - गुलाबी ऑखें जो 'तेरी देखी ,वासुदेव फणसे - खोया खोया चांद , व्यंकटेश कुलकर्णी - जिस गली मी तेरा घर ना हो बालमा ,प्रभाकर केळकर - वो हे जरा खफा खफा, मोरेश्वर ब्राम्हणे -वक्त करता जो वफा ,संजय देशपांडे -चौदहवी का चांद हो, - श्री दत्त पालखी ,माधवी जोशी - नाट्यपद देवमाणूस नाटकातील दिलदुवा ,विजया केळकर - क्या जानु सजन ,प्रगती पोवळे -तेरे प्यार का सागर ,चंद्रदास पटवर्धन -ये क्या हुआ , सुधाकर कुलकर्णी -सबकुछ सीका हमने ,धर्मसी भाटे -सहगल ची गाणी ,विष्णु डाकवले - सुहाना सफर ,सुप्रिया पाटील -निळा सावळा अशा अनेक सुमधुर गाण्याची मैफिल जेष्ठ नागरिक संगीत कट्ट्यावर रंगली. प्रमुख आकर्षण ठरलं ते ९२ वर्षाच्या भाटे आजोबांचे गाणं. या वयातही भाटे आजोबांचा उत्साह बघुन उपस्थित सर्वच गायकांना व रसिक प्रेक्षकांना एक वेगळंच स्फुरण चढलं होत . सोबत ८२ वर्षीय भालेराव काकांनी दत्ताच्या पालखीचं गाणं गाऊन रंगत आणली . अशा अनेक जेष्ठ नागरिकांचा गाण्याचा उत्साह बघुन सर्वच प्रेक्षकांनी संगीत कट्ट्याचे भरभरुन कौतुक केले व अभिनय कट्ट्याप्रमाणेच संगीत कट्टा देखील भविष्यात अनेक विक्रम रचणार यात शंका नाही असे मत एका जेष्ठ प्रेक्षकाने व्यक्त केले .ज्येष्ठ नागरिक संगीत कट्ट्याचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.